Mumbai News : मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी विरोधकांनी दिवसाच्या प्रारंभीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. मात्र, लक्ष वेधले ते शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्या आंदोलनाने. जामखेड मतदारसंघात एमआयडीसी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रोहित पवारांनी सोमवारी (ता. २४) विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायऱ्यांवर भर पावसात आंदोलन केले. याचे विधानसभेत पडसाद उमटले. त्यावर अर्थमंत्री अजित पवार संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
शासनाने दखल घ्यावी- देशमुख
रोहित पवारांच्या आंदोलनाचे पडसाद सभागृहात उमटले. याबाबत विधानसभेत बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, रोहित पवार यांनी मागील अदिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा येथे एमआयडीसीची मागणी केली होती. (Mumbai News) या मागणीला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले होते की, अधिवेशन संपायच्या आत त्याबद्दल आदेश काढू. आता दुसरं अधिवेशन आलं, तरी त्याचे आदेश निघालेले नाहीत. त्यासाठी ते उपोषण करत आहेत आणि शासनाने याची दखल घ्यावी, ही विनंती.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पावित्र्य राखले पाहिजे, या उद्देशाने तिथे आंदोलन किंवा उपोषण करायचे नाही, असे ठरले होते. रोहित पवार यांनी तिथे आंदोलन किंवा उपोषण करू नये. आपले मत सभागृहात येऊन मांडावे. (Mumbai News) माझी ही विनंती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सदस्यांनी त्यांची समजून घालावी, त्याचबरोबर शासनानेही त्यांची समजून घालावी. त्यांनी सभागृहात येऊन आपले म्हणणे मांडावे.
अजित पवारांचे खडे बोल
दरम्यान, रोहित पवार यांच्या आंदोलनावर अजित पवार म्हणाले की, या संदर्भातील पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. उदय सामंत यांनी १ जुलै २०२३ रोजी पत्र लिहून सांगितले की पाटेगाव खंडाळा (कर्जत जामखेड) येथील वसाहत औद्योगिक वसाहत जाहीर करण्याबाबत आपले पत्र मिळाले आहे. यावर सर्व संबंधितांसोबत चर्चा करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. (Mumbai News) आता मंत्र्यांनी पत्र दिले आहे. अजून अधिवेशन संपलेले नाही. लोकप्रतिनिधींनी निवेदन दिल्यानंतर त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद गेतली जाईल. अशा पद्धतीने उपोषणाला बसणे उचित नाही.
उदय सामंत यांचे आश्वासन
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, एमआयडीसी संदर्भातील निर्णयासाठी बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. अधिसूचना काढण्यासाठी उद्योग विभाग सकारात्मक असून, तातडीने निर्णय घेईल. लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने आंदोलन करतात तेव्हा सरकारने त्याची नोंद घ्यायची असते.(Mumbai News) त्यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो. विनंती केली. त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला.
… तर आमरण उपोषण करू- रोहित पवार
आंदोलन सुरू केल्यानंतर अनेक आमदार येऊन भेटले. उदय सामंत यांनी माझी भेट घेतली. उद्या बैठक बोलवणार आणि पुढच्या काही दिवसांत एमआयडीसीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असा शब्द त्यांनी दिला आहे. (Mumbai News) त्यामुळे मी हे आंदोलन मागे घेत आहे. पण, आश्वासन पूर्ण न झाल्यास माझ्या मतदारसंघातील हजारो युवा मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : पाकिस्तानी दहशतवादी… मुंबई पोलीस कंट्रोल रूमला फोन; एटीएस सतर्क!
Mumbai News : भाजपमध्ये पुन्हा मोठे फेरबदल; जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर