Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MSEDCL News : ऑनलाईन वीज बिल भरणा करणाऱ्यांची वाढतीये संख्या ; तब्बल 51 टक्के ग्राहकांनी निवडला ऑनलाईनचा पर्याय

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 24 July 2023, 13:06

गणेश सुळ
MSEDCL News केडगाव : बारामती परिमंडळात शेतीचे ग्राहक वगळून वीज बिल भरलेल्यांपैकी जवळपास 20 लाख ग्राहक आहेत. यापैकी तब्बल 51 टक्के ग्राहकांनी ऑनलाईन पर्यायाने वीज बिल भरले. तर जवळपास 49 टक्के ग्राहकांनी स्वतःचा वेळ व इतर सर्व खर्च करून घराबाहेर पडून वीजबिल भरले. आज सर्व शहरात, गावात 4 जी नेटवर्क पोहचले आहे. MSEDCL News

प्रत्येकाच्या खिशात स्मार्टफोन सुध्दा आहेत. मग आपली दैनंदिन कामे सुकर करण्यासाठी आपण त्यांचा वापर केला पाहिजे. चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यात भारताचे चांद्रयान-३ लवकरच यशस्वी होईल. डिजीटल इंडियासाठी हा गौरवाचा क्षण असेल.तरीदेखील याच डिजीटल इंडियात व महाराष्ट्रात तब्बल ४९ टक्के वीजग्राहक आजही पारंपरिक पद्धतीने स्वत:चा वेळ व पैसा वाया घालत रांगेत उभे राहून वीजबिल भरत असल्याचे वास्तव आहे.

उन्हातान्हात घराबाहेर पडून, स्वत:चा वेळ व पेट्रोलचा खर्च करुन वीजबिल भरता. त्यातील कुणी वीजबिल भरण्यासाठी स्वत:च्या कामावर उशिरा पोहोचते तर कुणाला अर्धा दिवसाची रजा टाकावी लागते. यासाठीच महावितरणचे वीज बिल वेळेआधी व घरबसल्या भरण्यासाठी अगदी सोप्पे पर्याय आपल्याकडे आहेत ते तुम्ही वापरू शकता.

 

ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठीचे पर्याय –

1. संकेतस्थळ : www.mahadiscom.in नावाने महावितरणचे संकेतस्थळ असून, या संकेतस्थळावर वीजबिल भरण्याची जलद सुविधा उजव्या कोपऱ्यात दिली आहे. १२ अंकी वीजग्राहक क्रमांक टाकून वीजबिल सहज भरता येते. गुगलवर view & pay bill सर्च केल्यास पैसे भरण्यासाठी wss सुविधा वापरता येते. सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांच्या नेटबँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर वीजबिल भरण्यासाठी करता येतो.

2. मोबाईल ॲप : प्ले स्टोअर व ॲप स्टोअरवर महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे. हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन आपण एकापेक्षा जास्त वीजजोडण्या जगाच्या पाठीवर कोठूनही हाताळू शकतो. यात वीजबिल पाहण्याची, भरण्याची, वीजपुरवठा व वीजबिलासंबंधी तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. नावात बदल, वीजभार कमी जास्त करण्याची मागणी सुद्धा यातून नोंदवता येते. लाखो ग्राहकांनी हे ॲप लाऊनलोड केले आहे.

3. UPI Gateways : BHIM, Gpay, PhonePay, Paytm यांसारखे UPI ॲप आपल्या बँक खात्याशी संलग्न करुन वीजबिल सुलभरित्या भरता येते. एकदा यावर वीजबिल भरले तर पुढचे वीजबिल तयार होताच हे ॲप आपल्याला ते भरण्याची सुचना देतात.

4. QR कोड : गेल्या काही वर्षांपासून वीजबिलावर क्यूआर कोड (Quick Response code) छापला जात आहे. बिलावरील क्यूआर कोडला युपीआय ॲपद्वारा स्कॅन केले की वीजबिल भरता येते. येथे वीजबिलाची रक्कम टाकण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे –

ऑनलाईन वीजबिल भरण्याचे अनेक फायदे आहेत. इथे वेळेसोबत इंधनाची बचत होते. वरील पर्यायाद्वारे एका क्लिकवर बील भरता येते. वीजबिल तयार झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत वीजबिल भरले तर जवळपास १ टक्का सूट मिळते. याशिवाय ऑनलाईन भरल्यामुळे अतिरिक्त पाव टक्का असे मिळून सव्वा टक्क्यांची बचत करता येते.

महावितरण मोबाईल ॲप लिंक –

https://play.google.com/store/apps/details?id=com.msedcl.app

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Next Post

Mumbai News : भर पावसात रोहित पवारांचे 'लक्षवेधी' उपोषण; अजित पवार संतप्त; उदय सामंतांची मध्यस्थी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.