Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : भर पावसात रोहित पवारांचे ‘लक्षवेधी’ उपोषण; अजित पवार संतप्त; उदय सामंतांची मध्यस्थी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 July 2023, 13:16

Mumbai News : मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी विरोधकांनी दिवसाच्या प्रारंभीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. मात्र, लक्ष वेधले ते शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्या आंदोलनाने. जामखेड मतदारसंघात एमआयडीसी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रोहित पवारांनी सोमवारी (ता. २४) विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायऱ्यांवर भर पावसात आंदोलन केले. याचे विधानसभेत पडसाद उमटले. त्यावर अर्थमंत्री अजित पवार संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

शासनाने दखल घ्यावी- देशमुख
रोहित पवारांच्या आंदोलनाचे पडसाद सभागृहात उमटले. याबाबत विधानसभेत बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, रोहित पवार यांनी मागील अदिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा येथे एमआयडीसीची मागणी केली होती. (Mumbai News)  या मागणीला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले होते की, अधिवेशन संपायच्या आत त्याबद्दल आदेश काढू. आता दुसरं अधिवेशन आलं, तरी त्याचे आदेश निघालेले नाहीत. त्यासाठी ते उपोषण करत आहेत आणि शासनाने याची दखल घ्यावी, ही विनंती.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पावित्र्य राखले पाहिजे, या उद्देशाने तिथे आंदोलन किंवा उपोषण करायचे नाही, असे ठरले होते. रोहित पवार यांनी तिथे आंदोलन किंवा उपोषण करू नये. आपले मत सभागृहात येऊन मांडावे. (Mumbai News) माझी ही विनंती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सदस्यांनी त्यांची समजून घालावी, त्याचबरोबर शासनानेही त्यांची समजून घालावी. त्यांनी सभागृहात येऊन आपले म्हणणे मांडावे.

 

अजित पवारांचे खडे बोल

दरम्यान, रोहित पवार यांच्या आंदोलनावर अजित पवार म्हणाले की, या संदर्भातील पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. उदय सामंत यांनी १ जुलै २०२३ रोजी पत्र लिहून सांगितले की पाटेगाव खंडाळा (कर्जत जामखेड) येथील वसाहत औद्योगिक वसाहत जाहीर करण्याबाबत आपले पत्र मिळाले आहे. यावर सर्व संबंधितांसोबत चर्चा करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. (Mumbai News) आता मंत्र्यांनी पत्र दिले आहे. अजून अधिवेशन संपलेले नाही. लोकप्रतिनिधींनी निवेदन दिल्यानंतर त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद गेतली जाईल. अशा पद्धतीने उपोषणाला बसणे उचित नाही.

उदय सामंत यांचे आश्वासन
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, एमआयडीसी संदर्भातील निर्णयासाठी बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. अधिसूचना काढण्यासाठी उद्योग विभाग सकारात्मक असून, तातडीने निर्णय घेईल. लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने आंदोलन करतात तेव्हा सरकारने त्याची नोंद घ्यायची असते.(Mumbai News)  त्यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो. विनंती केली. त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला.

… तर आमरण उपोषण करू- रोहित पवार
आंदोलन सुरू केल्यानंतर अनेक आमदार येऊन भेटले. उदय सामंत यांनी माझी भेट घेतली. उद्या बैठक बोलवणार आणि पुढच्या काही दिवसांत एमआयडीसीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असा शब्द त्यांनी दिला आहे. (Mumbai News) त्यामुळे मी हे आंदोलन मागे घेत आहे. पण, आश्वासन पूर्ण न झाल्यास माझ्या मतदारसंघातील हजारो युवा मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : पाकिस्तानी दहशतवादी… मुंबई पोलीस कंट्रोल रूमला फोन; एटीएस सतर्क!

Mumbai News : तिजोरीच्या चाव्या हाती येताच राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीचा वर्षाव; अर्थमंत्री अॅक्शन मोडवर; कोणाला किती निधी?

Mumbai News : भाजपमध्ये पुन्हा मोठे फेरबदल; जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post

Superdog Max : मुंबई पोलीस दलातला एकमेव गोल्ड मेडलिस्ट सुपरडॉग मॅक्स याचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.