Mumbai News : मुंबई : मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार मागील वर्षी पावसाळ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता सुधारित दराने मदत मिळणार आहे. त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. (Good news for farmers… Cabinet meeting big decision!)
पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते. या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे. (Mumbai News) नवीन सुधारित दराप्रमाणे जिरायत जमिनीसाठी ८ हजार पाचशे तर बागायत जमिनीसाठी १७ हजार रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे. यासाठी दीड हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील वर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरी, कापूस यासारख्या पिकांना मोठा फटका बसला. (Mumbai News) तर रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा यासारखी पिकं हातची गेली. केळी आणि द्राक्ष बागांचं देखील मोठं नुकसान झालं. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते. या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : ही बाळासाहेबांची शिवसेना नाही; ही तर मोदींची ‘शवसेना’; संजय राऊतांचा घणाघात!