Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादीतील दोन गटांनी शक्तीप्रदर्शन करत आजचा दिवस गाजवला. अजित पवार यांनी, प्रत्येकाचा एक काळ असतो, काळानुसार राजकारण बदलावे लागते, काही निर्णय घ्यावे लागतात, असे सूचवत शरद पवार यांनी आता आशिर्वाद द्यावेत असे अप्रत्यक्षपणे सुचवले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी वयाचा दाखला देणाऱ्या नेत्यांना सुनावले. वय हा फक्त आकडा आहे, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. आमच्यावर किती पण टीका करा; पण बापाचा नाद करायचा नाही, असा सज्जड दम त्यांनी विरोधकांना भरला. खचून न जाता पुन्हा नव्याने आणि जिद्दीने लढण्यासाठी कार्यकर्ते आणि आमदारांना बळ दिलं. यासोबत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मुद्दाही उचलून धरला. हे राजकारण आता कोणत्या टप्प्यावर जाणार, हे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पाहणार आहे.
ही लढाई भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात
भाजपनेच राष्ट्रवादीत खोडा घातल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी भाजप हा सध्या सर्वात भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा घणाघात केला. भाजपचे लोक नॅचरली करप्ट पार्टी, ना खाऊंगा ना खाने दूंगा आणि जब मुझे जरुरी पडेगे तब पुरा खा जाऊंगा, या देशात सर्वात भ्रष्टाचारी पार्टी कुठली असेल तर भाजप पक्ष आहे. (Mumbai News) हा आरोप मी नाही तर हे आरोप त्यांनी केले आहेत. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारी भाजपाच, राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत बसल्याचे अप्रत्यक्षपणे त्यांनी सुनावले. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. वाय. बी. चव्हाण सभागृहात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
हा बाप माझ्या एकटीचा नाही, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. बापाचा आणि आईच्या बाबतीत नाद नाही करायचा, बाकी कुणाच्याही बाबतीत बोला, बाकी काहीही ऐकून घेऊ. जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा महिला ताराराणी, अहिल्या होते. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही, भारतीय जनता पक्षाच्या वृत्तीविरोधात लढायचं आहे, असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.
शरद पवार यांच्या वयाबद्दल सतत बोललं जातं. मात्र, आज देशातील सर्वांत मोठ्या संस्थाचें मालक आजही काम करतात. त्याचं वय झालं तरी ते जास्त जिद्दीने काम करतात. आशीर्वाद तर आहेतच पण जिद्द पाहिजे. (Mumbai News) वय हा केवळ आकडा आहे. तुम्ही २०१९ चा इतिहास विसरला असाल, आम्ही विसरलो नाही. भारतीय जनता पक्षाविरोधात एका सभेने कसे पारडे पलटवले याचा दाखल देत सुप्रिया सुळे यांनी भाजपच नाही तर अजित पवार यांना टोला लगावला.
मुलं आपल्या वडिलांना घरी बसून तुम्ही आता आशिर्वाद द्या, असा सल्ला देतात, त्यापेक्षा मुली बऱ्या, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. घरावर संकट आले, अडचण आली की मुलीच धाऊन येतात, असे सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. या सगळ्या परिस्थितीमध्ये खचायचं नाही. (Mumbai News) जे गेलेत त्यांना शुभेच्छा. २०१९ मध्ये ११ जागा राष्ट्रवादीला दिल्या होत्या, पण साहेबांनी जे करुन दाखवलं ते पाहातच राहीले. मलाही गंमत वाटली सगळे हताश झाले होते. शपथविधी झाला आता काय होणार?
सत्ता येते जाते सत्तेनं सुख मिळत नाही. सत्तेनं सुख मिळतं असं वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे मी खूप जवळून पाहिलं आहे. आता ८-९ खुर्च्या मोकळ्या झाल्या, नव्या लोकांना तेवढी संधी मिळाली. नव्या उमेदीनं पक्ष सुरू होणार, ३३ टक्के आरक्षण महिलांना का देत नाही. नव्या उमेदीने पक्ष बांधणीच्या कामाला लागू, असे आवाहन त्यांनी केले. (Mumbai News) लोक काहीही म्हणू देत, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे, शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हही आपल्याकडेच राहील, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : दादांनी आजवर किती अपमान सहन केले, पण सावलीलाही…. धनंजय मुंडे भावूक! म्हणाले,