Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : आमच्यावर टीका करा; पण बापाचा नाद करायचा नाय… सुप्रिया सुळेंचा सज्जड दम!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 July 2023, 16:52

Mumbai News : मुंबई : राष्ट्रवादीतील दोन गटांनी शक्तीप्रदर्शन करत आजचा दिवस गाजवला. अजित पवार यांनी, प्रत्येकाचा एक काळ असतो, काळानुसार राजकारण बदलावे लागते, काही निर्णय घ्यावे लागतात, असे सूचवत शरद पवार यांनी आता आशिर्वाद द्यावेत असे अप्रत्यक्षपणे सुचवले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी वयाचा दाखला देणाऱ्या नेत्यांना सुनावले. वय हा फक्त आकडा आहे, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. आमच्यावर किती पण टीका करा; पण बापाचा नाद करायचा नाही, असा सज्जड दम त्यांनी विरोधकांना भरला. खचून न जाता पुन्हा नव्याने आणि जिद्दीने लढण्यासाठी कार्यकर्ते आणि आमदारांना बळ दिलं. यासोबत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मुद्दाही उचलून धरला. हे राजकारण आता कोणत्या टप्प्यावर जाणार, हे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पाहणार आहे.

ही लढाई भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात

भाजपनेच राष्ट्रवादीत खोडा घातल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी भाजप हा सध्या सर्वात भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा घणाघात केला. भाजपचे लोक नॅचरली करप्ट पार्टी, ना खाऊंगा ना खाने दूंगा आणि जब मुझे जरुरी पडेगे तब पुरा खा जाऊंगा, या देशात सर्वात भ्रष्टाचारी पार्टी कुठली असेल तर भाजप पक्ष आहे. (Mumbai News) हा आरोप मी नाही तर हे आरोप त्यांनी केले आहेत. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारी भाजपाच, राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत बसल्याचे अप्रत्यक्षपणे त्यांनी सुनावले. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. वाय. बी. चव्हाण सभागृहात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

हा बाप माझ्या एकटीचा नाही, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. बापाचा आणि आईच्या बाबतीत नाद नाही करायचा, बाकी कुणाच्याही बाबतीत बोला, बाकी काहीही ऐकून घेऊ. जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा महिला ताराराणी, अहिल्या होते. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही, भारतीय जनता पक्षाच्या वृत्तीविरोधात लढायचं आहे, असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.

 

शरद पवार यांच्या वयाबद्दल सतत बोललं जातं. मात्र, आज देशातील सर्वांत मोठ्या संस्थाचें मालक आजही काम करतात. त्याचं वय झालं तरी ते जास्त जिद्दीने काम करतात. आशीर्वाद तर आहेतच पण जिद्द पाहिजे. (Mumbai News) वय  हा केवळ आकडा आहे. तुम्ही २०१९ चा इतिहास विसरला असाल, आम्ही विसरलो नाही. भारतीय जनता पक्षाविरोधात एका सभेने कसे पारडे पलटवले याचा दाखल देत सुप्रिया सुळे यांनी भाजपच नाही तर अजित पवार यांना टोला लगावला.

मुलं आपल्या वडिलांना घरी बसून तुम्ही आता आशिर्वाद द्या, असा सल्ला देतात, त्यापेक्षा मुली बऱ्या, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. घरावर संकट आले, अडचण आली की मुलीच धाऊन येतात, असे सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. या सगळ्या परिस्थितीमध्ये खचायचं नाही. (Mumbai News) जे गेलेत त्यांना शुभेच्छा. २०१९ मध्ये ११ जागा राष्ट्रवादीला दिल्या होत्या, पण साहेबांनी जे करुन दाखवलं ते पाहातच राहीले. मलाही गंमत वाटली सगळे हताश झाले होते. शपथविधी झाला आता काय होणार?

सत्ता येते जाते सत्तेनं सुख मिळत नाही. सत्तेनं सुख मिळतं असं वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे मी खूप जवळून पाहिलं आहे. आता ८-९ खुर्च्या मोकळ्या झाल्या, नव्या लोकांना तेवढी संधी मिळाली. नव्या उमेदीनं पक्ष सुरू होणार, ३३ टक्के आरक्षण महिलांना का देत नाही. नव्या उमेदीने पक्ष बांधणीच्या कामाला लागू, असे आवाहन त्यांनी केले. (Mumbai News) लोक काहीही म्हणू देत, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे, शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हही आपल्याकडेच राहील, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : राजीनामा मागे घ्यायचाच होता तर… अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल! म्हणाले, प्रत्येकाचा काळ….

Mumbai News : माझ्या विठ्ठलाला विनंती आहे, मला आशीर्वाद द्या… अजित पवारांचे शरद पवारांना भावनिक आवाहन; म्हणाले, कितीही अपमान…

Mumbai News : दादांनी आजवर किती अपमान सहन केले, पण सावलीलाही…. धनंजय मुंडे भावूक! म्हणाले,

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Mpsc News : देऊळगाव राजे येथील विशाल पोळ एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण ; गावातील पहिला फौजदार होण्याचा मिळविला बहुमान...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.