Mumbai News : मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय अद्याप येणं बाकी आहे. असे असताना आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केले. ‘सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरू शकतात. पण त्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधिमंडळाला आहे’, असे झिरवळ म्हणाले.
आज ना उद्या याबाबत निर्णय घ्यावाच लागणार
रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.(Mumbai News) झिरवाळ यांनी सांगितले की, ’16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कधी ना कधी निर्णय होणारच आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत आगामी काळात वाढ होऊ शकतात. शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या निर्णयाकडे संपर्ण देशाचे लक्ष आहे. आज ना उद्या याबाबत निर्णय घ्यावाच लागणार आहे.’
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय किती वेळात होणार हे महत्वाचे नाही. (Mumbai News) हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे. त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.