MP Supriya Sule News : पुणे : नऱ्हे भागातील समस्या खूप गंभीर आहेत. नव्याने विकसित होणाऱ्या भागातील समस्या या जास्त गुंतागुंतीच्या असून याकडे महानगरपालिकेने जास्त लक्ष देवून या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरी संवाद दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. (Municipalities should take the initiative to solve the problems of developing areas: MP Supriya Sule)
नागरी संवाद दौरा : नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद
नागरी दौऱ्याच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी नऱ्हे भागातील पारी टॉवर, परांजपे अभिरुची परिसर, श्रीनिवास सोसायटी, साईरत्न सोसायटी या ठिकाणी भेट देताना येथील नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या तसेच येथील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. (MP Supriya Sule News)
या दौऱ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने करण्यात आले होते. (MP Supriya Sule News) यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण, महिला अध्यक्ष राजेश्वरी पाटील, माजी नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष शरद दबडे, स्वाती पोकळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नऱ्हे परिसराला पालिकेकडून नेहमीच दुजेपणाची वागणूक दिली जाते. (MP Supriya Sule News) यामुळे अनेक समस्या असून देखील प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करते. किमान रस्ते, पाणी, वाहतूककोंडी या मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मुरलीधर मोरे यांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मुंढव्यात पबमध्ये प्रवेश नाकारल्याच्या रागातून वेटरवर धारदार शस्त्राने वार
Pune News : मोदी सरकार म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल; काँग्रेसच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका