MLA Makarand Patil : पांचगणी, (सातारा) : वाई- खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद आबा पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. (MLA Makarand Patil(
महाबळेश्वर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला..
राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची आणि कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी आश्वासन अजित पवार यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य पातळीवर राजकीय घडामोडी घडल्यानंतर राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षीय भूमिकेबाबत संभ्रमात आहे. याच पार्श्वभूमीवर वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आमदार मकरंद पाटील यांच्या निर्णयावर अवलंबून होती.
जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय घडी बसवून स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणारे मकरंद पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे.
शरद पवार यांना मानणारे तालुक्यात असंख्य जुने-नवे कट्टर कार्यकर्ते आहेत. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दुफळी पडल्याने महाबळेश्वर तालुक्यातही गावागावात याची जोरदार चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी आगोदर आमदार मकरंद पाटील हे अजितदादा यांच्या बैठकीला हजर होते. त्यानंतर आबांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून शरद शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. त्याअगोदर शपथ विधी दरम्यान आबांचे नाव अजित दादांच्या गोटात येत होते परंतु नंतर ते नाव मागे पडले.
मुंबई येथील अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर विधानसभेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, अमित दादा कदम, पांचगणीचे माजी नगराध्यक्ष शेखर कासूर्डे, शशिकांत पिसाळ, प्रमोद शिंदे, मनिष भंडारी, अनिल सावंत, रमेश गायकवाड, मोहन जाधव, उदय भोसले, मदन भोसले, किरण काळोखे, चरण गायकवाड, बाळासाहेब सोळस्कर, उदय कबुले, आदींसह महाबळेश्वर, वाई, खंडाळा तालुक्यातील तिन्ही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजितदादांना पाठिंबा देण्यात आला.