Milk Rate Hike : राज्यात दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसत आहे. राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरवात झाली आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, आज अर्थमंत्री विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करणार असताना शेतकऱ्यांनी राज्यात त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बैठकीला न बोलविल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर राज्यात इतर ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांनी यापूर्वीच दूधाचे भाव वाढवले आहे. आता खुल्या बाजारातील दुधाचे दर वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सांगलीत शेतकरी आक्रमक..
महाराष्ट्र इनाम जमिनी खालसा करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप जमिनी खालसा झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग उदासीन आणि चिंतेत आहे. या बाबत विधानसभेत चर्चा होऊनही अंमलबजावणी झाली नाही. शिवाय दूध संघाकडून आणि खाजगी दूध संघाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून 26 ते 27 रुपये गाईचे दूध खरेदी करून ग्राहकांना 58 ते 60 रुपये विकत आहेत. शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भाव देत असल्याने या निषेधार्थ आज पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करत, जोपर्यंत गाईच्या दुधाला 40 रुपये भाव मिळत नाही, तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यात रास्ता रोको
दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
दुधाला 40 रुपये दर अपेक्षित असताना फक्त 22 ते 25 रुपये दर मिळत आहे. हा सरकारने टाकलेला दरोडा आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर सर्व सरकारी कार्यालयांसह मंत्रालयात शेण ओतून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात उद्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी.. मात्र या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी न बोलावता केवळ शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्याना निमंत्रित करण्यात आल्याने ही बैठक आम्हाला मान्य नाही अशी भूमिकाही शेतकऱ्यांनी यावेळी घेतली आहे.