Manoj Jarange Patil : पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी, २ जानेवारीपर्यंत आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढणार, या सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे सध्या रूग्णालयात आहेत. याचदरम्यान आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे..
मनोज जरांगे पाटील यांचा दौरा कसा असेल?
* १५ नोव्हेंबर
वाशी, परांडा करमाळा
* १६ नोव्हेंबर
दौंड, मायनी
* १७ नोव्हेंबर
सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड
* १८ नोव्हेंबर
सातारा, वाई, रायगड
* १९ नोव्हेंबर
रायगड, पाचाड, महाड, मुळशी, आळंदी
* २० नोव्हेंबर
तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा
* २१ नोव्हेंबर
ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर
* २२ नोव्हेंबर
विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर
* २३ नोव्हेंबर
नेवासा, शेवगाव, बोधगाव
विदर्भ, उर्वरित मराठवाडा, कोकण असा पुढचा महाराष्ट्र दौऱ्याचा टप्पा असेल, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. माहिती दौऱ्यात कोणाकडून पैसे घेतले जात नाहीत. कोणी पैसे मागितले तरी देऊ नका. पैसे घेत असल्याचे कळल्यास समाज गय करणार नाही. यामुळे आमच्या आंदोलनाला डाग लागणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. पुराव्याच्या आधारे सरसकट प्रमाणपत्र द्या. शिष्टमंडळाची वाट बघून मी म्हातारा होत आहे, असेही जरांगे म्हणाले.