Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune ISIS module : पुणे इसिस मॉड्यूलमधील उच्चशिक्षित दहशतवाद्यांकडून स्फोटकांसाठी कोडवर्डचा वापर; ‘एनआयए’ची माहिती

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 9 November 2023, 12:38

Pune ISIS module : पुणे : शहरातील इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आरोपी कादीर पठाण पुण्यात ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळत आहे. त्याने साथीदार इम्रान खान आणि युनूस साकी यांनाही ग्राफिक्स शिकवले होते. आरोपी आपली ओळख लपून राहावी म्हणून ग्राफिकची कामे करुन पैसे कमवत होते, अशी माहिती ‘एनआयए’कडून मिळत आहे. आरोपींनी ‘आयईडी’ स्फोटक बनवण्यासाठी काही गोष्टी खरेदी केल्या होत्या. ज्यामध्ये काही केमिकल्स होती. या केमिकल्ससाठी ते कोडवर्डचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

दहशतवाद्यांनी सल्फरिक अॅसिडसाठी ‘विनेगार’ हा कोडवर्ड ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी ‘रोजवॉटर’ तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी ‘शरबत’ हा कोडवर्ड होता. या प्रकरणातील आरोपींना मोहम्मद नावाचा एक हँडलर ऑपरेट करत होता. तसेच आयईडी बॉम्ब बनवण्याचे काम आरोपींकडून युद्धपातळीवर सुरु होते, असे ‘एनआयए’ने आरोपपत्रात म्हटले आहे.

‘एनआयए’ने आरोपपत्रात सांगितल्यानुसार, पुणे इसिस मॉड्यूल प्रकणातील दहशतवादी उच्चशिक्षित असून, त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज होते. आरोपी जुल्फीकार अली एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला होता. त्याला वार्षिक ३१ लाख रुपये पगार होता. उर्वरित आरोपींपैकी शाहनवाज शैफुजामा हा मायनिंग इंजिनिअर होता. त्याला स्फोटकांबद्दल माहिती असल्याने त्याचा वापर करुन त्याने बॉम्बची निर्मिती केली होती.

दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सात आरोपींवर आरोपपत्र दाखल केले असून, त्यामध्ये मोहम्मद इमरान, मोहम्मद याकूब साकी, अब्दुल कदीर, नसीरुद्दीन काजी, जुल्फिकार अली, शमील साकिब नाचन आणि आकिफ अतीक नाचन यांचा समवेश आहे. यातील पाच आरोपी महाराष्ट्रातील आणि पुणे-मुंबई येथील आहेत तर दोघे मध्य प्रदेशमधील आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Friday, 2 October 2026, 23:08

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Friday, 2 October 2026, 22:23

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

Friday, 2 October 2026, 21:14

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59
Next Post
daund-news avoid online shopping

एका क्लिकवर होणारी ऑनलाईन खरेदी टाळा, स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्या; ग्राहकांना आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp