राहुलकुमार अवचट

पुणे : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या ( 1 ऑक्टोबर) निमित्ताने पोलीस प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिकांमधील संवाद अधिक सुदृढ करण्यासाठी “पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद” हा उपक्रम यवत पोलिस स्टेशनच्या वतीने राबवण्यात आला.या निमित्ताने आयोजित संवाद सत्रात पोलीस आणि ज्येष्ठांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली,ज्येष्ठ नागरिक यांचा वृद्धापकाळ चांगल्या पद्धतीने घालवता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना वैद्यकीय मदत वेळेत मिळावी या उद्दिष्टांच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून आवश्यक उपयोजना कराव्यात याबाबत परिसंवाद चर्चा करण्यात आली
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकीरे यांनी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून सध्याच्या डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीचे लक्ष्य केले जात आहे असून यादरम्यान अनोळखी व्यक्तींना बँक खात्याचे तपशील, एटीएम पिन किंवा ओटीपी शेअर करू नका असे सांगण्यात आले.मोबाईलचा वापरताना लॉटरी लागणे, वीज बिल थकणे, किंवा केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली येणाऱ्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका, कोणत्याही ऑनलाईन व्यवहारासाठी अनोळखी व्यक्तींची मदत घेताना सावध राहा,घरात कुरियर बॉय, सेल्समन किंवा दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तींना ओळखपत्राची खात्री केल्याशिवाय प्रवेश देऊ नका, जे ज्येष्ठ नागरिक घरी एकटे राहतात, त्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदणी आवश्यक करा आहे आदी बाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले

तसेच ज्येष्ठांना असलेल्या हक्कांची जाणीव करून देत कोणत्याही आपत्कालीन किंवा संकटसमयी तात्काळ मदतीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारणासाठी केंद्र सरकारची 14567 ही राष्ट्रीय हेल्पलाईन उपलब्ध आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे कौटुंबिक वाद, मालमत्तेचे वाद मिटवण्यासाठी आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये विशेष ‘भरोसा कक्ष’ कार्यरत असतात.याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व ज्येष्ठांचे स्वागत करत अल्पोहाराची सोय करण्यात आली होती.

यवत पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जनार्दन चांदगुडे यांनी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.यावेळी गोपनीय विभागाचे गणेश कुतवळ, दत्तात्रय दोरगे, विनायक दोरगे, शिवाजी कदम, कुंडलिक दोरगे, दत्तात्रय अवचट, विनायक रंधवे, नारायण कदम यांसह अनेक ज्येष्ठ नागरिक होते.







