(Local Body Election) नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली असून पुढील सुनावरणी 28 मार्च रोजी होणार आहे. या बाबतची सुनावणी ऑगस्ट 2022 पासून वारंवार पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Local Body Election) मार्ग कधी मोकळा होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात मागील चार महिन्यांपासून तारीख पे तारीख सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुनावणी झाली. 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी केवळ आदेश देणे बाकी असल्याचे वकिलांनी म्हणणे आहे. कोणताही मुद्दा प्रलंबीत नाही तुम्ही एक तर आधीच्या अथवा आत्ताच्या पद्धतीनुसार निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला सांगायचं असल्याचे वकिलांनी सांगितले.
नेमके प्रकरण आहे तरी काय ??
राज्यातील निवणुका दोन कारणांमुळे न्यायालयिन प्रकरणात अडकल्या आहेत.
– ओबीसी आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला. मात्र आधी जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्येही हे आरक्षण मिळावे. यासाठी शिंदे सरकार न्यायालयात जाण्याचा मार्ग निवडला.
– महाविकास आघाडीच्या काळातील वॉर्डरचना 4 ऑगस्ट रोजी एका अध्यादेशाने शिंदे-फडणवीस सरकारने बदलली. 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने जैसे थे आदेश दिला, त्यानंतर आजपर्यंत या प्रकरणांवर सुनावणी झालेली नाही.
न्यायालयाचा निर्णय आला तर काय होणार…
ठाकरे सरकारने तयार केलेली वॉर्ड रचना सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली तर निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
– मात्र 23 महानगरपालिका, 207 नगपालिका, 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समिती अशा सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत.
– यामुळे निवडणूक आयोग दोन टप्प्यात निवडणुका घेऊ शकते.
– काही निवडणुका पासाळ्यापूर्वी तर काही पावसाळ्यानंतर निवडणुका होऊ शकतात.
शिंदे सरकारची वॉर्ड रचना न्यायालयाने मान्य केली तर..
– निवडणूक आयोगाल पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार
– त्यामुळे निवडणूक आयोगाला वेळ लागण्याची शकता.
– यामुळे या सर्व निवडणुका पावसाळा झाल्यानंतर होण्याची शक्यता
– मुंबई-पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Paranda News : परंडा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी उद्घाटन!
Pune Crime : बिबट्याच्या हल्ल्यात गरोदर महिला जखमी ; पुण्याच्या आंबेगाव परिसरातील घटना!
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना धक्का ! पुण्यातील माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश!