Indapur Crime News : इंदापूर, (पुणे) : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या बारामती ॲग्रो (Baramati Agro) कारखान्याने मुदतीपूर्वीच गाळप हंगाम (starting the season) सुरू केल्याप्रकरणी कारखान्याचे कार्यकारी संचालकावर ( Executive Director) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
सुभाष जे. गुळवे (रा. शेटफळगडे साखर कारखाना ता. इंदापुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी संजय ठकुजी गोंदे, (वय – ५३ रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी भिगवन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कारखाना
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या बारामती ॲग्रो कारखान्याने गाळप लवकर केले अशी तक्रार भाजप नेते राम शिंदे यांनी साखर आयुक्ताकडे केले होती. राज्य सरकारकडून यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर रोजी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र, बारामती अॅग्रो साखर कारखान्याने १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते राम शिंदे यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशीसाठी साखर आयुक्तालयातील चौकशी विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्यानं लेखापरिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
यासंदर्भात चौकशी झाल्यानंतर झाल्यानंतर बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री समितीचा निर्णय तसेच साखर आयुक्त कार्यालयाच्या दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या परिपत्रकीय सूचनांचे उल्लंघन करून बारामती ॲग्रो शेटफळ (ता. इंदापूर) यांनी दिनांक १० ऑक्टोंबर २०२२ रोजी विना परवाना दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२ पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचे अप्पर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी शासनास सादर केलेल्या चौकशी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य साखर संकुल शिवाजीनगर पुणे ५ यांच्याकडून मिळालेल्या ६ मार्च २०२३ रोजीच्या पत्रानुसार बारामती ॲग्रो कारखान्याने गाळप हंगामाचा परवाना न घेता १५ ऑक्टोंबर २०२२ पूर्वी गाळप सुरू केले गेले त्यामुळे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांच्यावर १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.