अजित जगताप
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे खटाव तालुक्यातील सातेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आलेच नाहीत. त्यामुळे भाजप आमदार जयकुमा गोरेंच्या बालेकिल्ल्यात रामराजेंची गैरहजेरी चांगलीच जाणवली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा गाजावाजा करून व वाहनांची व्यवस्था करून खटाव तालुक्यातील कार्यकर्ते आणले होते. तसेच डझनभर नेते उपस्थित होते.परंतु,राष्ट्रवादी मेळाव्याची खटाव तालुक्यात म्हणावी अशी शाब्दिक मशाल फारशी पेटली नाही.आ शशिकांत शिंदे व आ अमोल मेटकरी यांनी आपल्या भाषणातून थोडी फार जाण आणली, पण, इतरांच्या मार्गदर्शनाला फारशी कोणी दाद दिली नाही.
राष्ट्रवादी विरोधात आक्रमक झालेल्या आमदार जयकुमार गोरे यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी चांगला मोका होता पण,आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर काही कारणास्तव खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीच्या शेजारी असलेल्या सातेवाडी येथे येऊ शकले नाहीत.
आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मांडणी करीत राजकीय घडामोडी बाबत भाष्य केले तर आ. अमोल मेटकरी यांनी सांगितले की,साडेसहाशे किलोमीटर अकोला येथून आलो आहे. बाजूच्या आमदारांसॊबत मुद्याशी लढाई मुद्याशी लढत आहे.राष्ट्रवादी सहनशिलता बाळगत असली तरी विरोधकांना शिंगावर घेतले पाहिजे असा सावध सल्ला देत पुढे म्हणाले,पक्षाचा नेता नाही कार्यकर्ता आहे, एक रुपया खर्च न करता फुकट आमदार झालो आहे चार एकर कोरड वाहू जमीन असलेला शेतकरी आहे. किराणा दुकान आहे. चहा वाला पंतप्रधान मग दुकानावाला आमदार का होऊ शकत नाही? असा सवाल करून ते म्हणाले खरे हिंदुत्व म्हणजे इतर धर्माचा तिरस्कार न करणे हा होय.
पन्नास खोके घेऊन शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून झाडी, डोंगर हे निवडणूक चिन्ह घेतले पाहिजे होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळासाहेव देवरस यांचे नाव शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना असे घेतले आहे. शरम भि उनको शरमा थी है असा ही शाब्दिक टोला लगावला. गाई-बैल यांना डोस २२ दिवसात डोस दिला तर प्रतिकार शक्ती वाढली की,गुरे वाचतात.तरीही गुजरातला जनावरांची औषध पाठविले,गुजराती, मारवाडी, ब्राह्मण समाज आत्महत्या करत नाहीत, हिंदू समाज्यातील अठरा पगड जाती आत्महत्या करतात.
राष्ट्रवादी ५५,काँग्रेस ४४व शिवसेना६६ आमदार एकत्र करून स्वप्नात आघाडी होईल असे वाटले नव्हते ती किमया पवारसाहेबांनी करून दाखवली. नव्हती, समीकरण जुळले,शिवाजी महाराजांचे चरित्र सांगणारी माणसं आहोत, मोदी किंवा शहा चे नाव घेऊन अंधेरीच्या पोट निवडणूक जिंकून दाखवावे असे ही त्यांनी आवाहन केले. यावेळी शिवाजी महाराजांचे चरित्र सांगणारी माणसं आहोत, मोदी किंवा शहा चे नाव घेऊन अंधेरीच्या पोट निवडणूक जिंकून दाखवावे.राजकारण सोडा पण, भाजप मध्ये जाऊ नका, पन्नास खोके, एकदम ओके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी असो अशा घोषणाबाजी करण्यात आली.
या मेळाव्याला खा श्रीनिवास पाटील, आ बाळासाहेब पाटील, आ मकरंद पाटील,आ दिपक चव्हाण, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनिल माने,प्रभाकर देशमुख,नंदकुमार मोरे, प्रा बंडा गोडसे,प्रदीप विधाते,संदीप मांडवे, संतोष साळुंखे, सुरेंद्र गुदगे, जितेंद्र पवार,तेजस शिंदे,शशिकला देशमुख,मनोज कुंभार, राजू फडतरे, विजय शेटे, सॊमनाथ साठे,लालासाहेब माने,योगेश जाधव,निलेश जाधव, अजित साठे,मनोज घाडगे यांच्या सह खटाव तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर एस पी देशमुख यांनी आभार मानले.
दरम्यान, खटाव-माण भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे माळी समाज्यातील असून त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लिंगायत समाज्याचे आमदार अमोल मेटकरी साडे सहाशे किलोमीटर अंतरावरून आले होते पण, त्यांनी व्यक्तिगत टीका टाळली.त्यांनी कुठेही आमदार गोरे यांचा नामोहलेख न करता संयमी रित्या भाषण केले