मुंबई- Sanjay Raut : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. (Sanjay Raut) यामध्ये न्यायालयाने म्हटले की ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे. (Sanjay Raut) तर 16 आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. (Sanjay Raut) तसेच जुनं सरकार परत आणण्याचे न्यायालयाने फटकारले असल्याने महाराष्ट्रात शिंदे सरकार कायम राहणार आहे. (Sanjay Raut) त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut)
16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे
राऊत म्हणाले, शिंदे सरकारने दिलेला व्हिप बेकायदा असल्याने पुढील सगळे निर्णय बेकायदा आहेत. राज्यापालांचे सगळे निर्णय घटनाबाह्य आहे. 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार आहे. तर येऊ द्यात. येथे व्हिपच घटना बाह्य असेल तर 16 आमदार अपात्र होतील. हा निकाल देशाला, महाराष्ट्राला दिशा देणार आहे.
न्यायालायाने नोंदविलेले निरीक्षण योग्य आहेत. न्यायालयाने सांगितल्या नुसार व्हिप तपासून आता विधान सभा अध्यक्षांना निर्णय घेयचा आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकारने पेढे वाटप करत बसू नये. हे सरकार बेकायदा आहे. आता शिंदे यांनी राजीनामा द्यावा. शिंदे सरकारला कोणताही दिलासा दिलेला नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : महाराष्ट्र सत्तासंघर्ष ! शिंदे गटाला मोठा धक्का ; भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर
Politics | महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून असणाऱ्या सत्तासंघर्षावर ‘या’ दिवशी लागणार निकाल…!