पुणे : राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रोपदी मुर्मू यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठा पराभव केला आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चोबाधणी केलेली होती. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत.
द्रोपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 खासदारांची मतं मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मतं मिळाली. द्रोपदी यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या मतांचं मूल्य 3 लाख 78 हजार तर यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचं मूल्य 1 लाख 45 हजार इतकं होतं. या दरम्यान पहिल्या फेरीत 15 मतं रद्द झाली.
द्रौपदी मुर्मू यांना दुसऱ्या फेरीतील मतमोजणीतही घवघवीश मतं मिळाली. द्रोपदी मुर्मू यांना 1349 मतदान झालं. त्या मताचं मूल्य 483299 इतकं आहे. तर यशवंत सिन्हा यांना मतांची मुल्य ही 179876 इतकं ठरलं. द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजेच 24 जुलै सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.