उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मणीभाई देसाई सहकारी या पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या 13 जागासाठी मतदान 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी पाच या दरम्यान होणार आहे.
निवडणूकिसाठी उमेदवारी अर्ज आज शुक्रवारपासून (ता. ०४) स्वीकारले जाणार असून अर्ज स्वीकारण्यासाठी पुढील शुक्रवार (ता. ११) पर्यंत आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी जाहीर केले आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या संस्थेची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून अर्जाची छाननी सोमवार दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होईल, १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ मंगळवार दि. १५ नोव्हेंबर ते मंगळवार दि. २९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील, पात्र उमेदवारांना चिन्ह वाटपाचा कार्यक्रम बुधवार दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होईल, मतदान रविवारी ११ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येईल.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेवर संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र या निवडणुकीत राजेंद्र कांचन यांचे एकेकाळचे सहकारी व पतसंस्थेचे माजी मानद सचिव सुनील जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, राष्ट्रवादीचे युवा नेते अर्जुन कांचन हे राजेंद्र कांचन यांच्या विरोधात निवडणुकीसाठी दंड थोपाटण्याची शक्यता आहे.