भोर / तुषार सणस : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे-सातारा महामार्ग येथून कोल्हापूर येथे कार्यक्रमासाठी निघाले असताना खेड-शिवापूर आणि कापूरहोळ ठिकठिकाणी राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.
अजित पवार हे कोल्हापूर सभेसाठी जात असताना भोर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच भोर तालुक्यात येत असल्यामुळे जेसीबीद्वारे फुलांची उधळण केली. ‘एकच वादा अजितदादा’ अशा घोषणा देत त्यांचे जोरदार स्वागत केले. त्या ठिकाणी तालुक्यातील विकासकामासंदर्भात निवेदन देत रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवापूर टोल नाका येथे भालचंद्र जगताप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य, दादा डिंबळे ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस, गणेश खुटवड भोर तालुका युवक अध्यक्ष केतन चव्हान युवक अध्यक्ष भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र पवार खडकवासला अध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
तर पुढे कापूरहोळ येथेही विक्रम खुटवड युवा मंचच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सत्कार करण्याचे आयोजन केले होते. परंतु कापूरहोळ येथील पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी ६ किलोमीटर अंतरावर वाहतूक कोंडी झाली असता ती पोलीस दलाच्या मदतीने विक्रम खुटवड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमवेत हटवली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी तयार झाले. उपमुख्यमंत्र्यांचा ताफा येताच आमचा दादा रुबाबदार गाणे डिजेला लावत जेसीबीने पुष्पवृष्टी केली. त्यांचा सत्कार विक्रम खुटवड यांच्या हस्ते झाला असता पाठीवर शाबासकीची थाप मारत प्रतिसाद दिला. त्या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांसमवेत हस्तांदोलन करत पुढील कार्यक्रमास अजित पवार निघून गेले.
यावेळी धनेश डिंबळे, सचिन सोंडकर, माऊली राऊत, स्वप्निल शेलार, राहुल गाडे,समीर धुमाळ,माऊली कांबळे, अशोक मोरे, नथुराम गायकवाड, गणेश मालुसरे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.