संदीप टुले
Daund News : दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्याचे विभाजन करून पाटसला नव्या पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात येईल. तसेच, दौंड शहरात आणखी एक पोलिस चौकशी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.२७) विधानसभेत केली. त्यामुळे फडणवीसांनी आमदार राहुल कुल यांच्या दौंड मतदारसंघात एकप्रकारचे ‘गिफ्ट’ दिल्याची चर्चा आहे.(Daund News)
पाटसला नव्या पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात येईल.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी (ता.२७) विधानसभेत लक्षवेधीद्वारे तालुक्यातील गृहविभागासंदर्भाती मागणी केली होती. त्यात पाटसला पोलिस ठाणे, तर वाढत्या दौंड शहरासाठी पोलिस चौकी करावी, असे त्यात म्हटले हेाते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी कुल यांना पोलिस ठाणे आणि पोलिस चौकी देत एक प्रकारचे ‘गिफ्ट’च दिले आहे.(Daund News)
याशिवाय दौंड तालुका ७० टक्के ‘पीएमआरडीए’मध्ये गेलेला आहे. तालुक्यात रेल्वे जंक्शन व रेल्वेलाईन, तीन महामार्ग आणि एक एमआयडीसी आहे. असं असूनही तालुक्यात केवळ दोनच पोलिस स्टेशन आहेत. त्यामुळे पाटसला नवीन पोलिस ठाणे सुरू करावे. त्याचा प्रस्तावही तयार केला हेाता. त्याची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी कुल यांनी विधानसभेत केली.(Daund News)
त्यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस यांनी राहुल कुल यांनी पाटस पोलिस ठाण्याच्या संदर्भात केलेली मागणी मी मंजूर करत आहे, अशी घोषणा केली. पोलिसांचा आकृतीबंध नसल्यामुळे ही मागणी एवढे दिवस मान्य होत नव्हती. पण आपण आता पोलिसांच्या नवीन आकृतीबंधाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे नव्या पोलिस ठाण्यासंदर्भातील प्रश्न मिटला आहे. दौंड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत एक पोलिस चौकी निर्माण करण्यासाठीही आपल्याला जागा उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे दौंड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत एक पोलिस चौकीही मंजूर करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.(Daund News)
दरम्यान, पाटस पोलिस चौकीमुळे यवत व दौंड पोलिस स्टेशनचा अतिरिक्त ताण कमी होणार असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मिटणार आहे.