दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दादाराम काळेल यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीत सोमवारी (दि.२८) भाजप पक्षात प्रवेश केला.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दादाराम काळेल व कार्यकर्त्यांचा सत्कार करुन स्वागत केले.
यावेळी छगन भोंगळे, नारायण वीर, मच्छिंद्र अभंग, हिरालाल पारेकर, दिलीप भिसे, काळेल गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करत असून, राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्के बसत आहेत.
काही दिवसांपूर्वी इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल बोराटे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.
तर दोनच दिवसापूर्वीच काझड येतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.