Breaking News : दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपशी हातमिळवणी केली. या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गटाकडून पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले. आता हाती मशाल घेऊन गड लढविण्यासाठी ठाकरे गट सज्ज होत असतानाच, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या चिन्हावर समता पक्षाकडून दावा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ होणार हे मात्र नक्की आहे.
ठाकरेंच्या मशाल चिन्हावर ‘या’ पक्षाचा दावा…
दरम्यान, निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. ते चिन्ह आमच्या पक्षाचे असल्याचा दावा समता पक्षाकडून करण्यात आला आहे. (Breaking News) त्यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणात काय निर्णय देणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बहुमताच्या आधारावर पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना नावावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर उपलब्ध पुराव्याच्या आधारे शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला. सध्या उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले आहे. (Breaking News) मात्र, यावर देखील आता समता पक्षाने दावा केला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटात अनेक घडामोडी घडल्या. अनेक राजकीय पेचप्रसंग निर्माण झाले. शिवसेनेतील बड्या नेत्यांची फळी शिंदे गटाला मिळाली. ठाकरे गटातील आऊटगोईंग अद्याप सुरूच आहे. (Breaking News) त्यातच महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून वेगळी चूल मांडली. या सर्व राजकीय घटना-घडामोडींचा परिणाम निश्चितच ठाकरे गटावर होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर; राष्ट्रवादी निर्णयावर ठाम, शिवसेना आक्रमक…