Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील ‘त्या’ दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ शनिवारी गाव राहणार “बंद’ ; शाळा, महाविद्यालये सुरु राहणार..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 14 July 2023, 13:53

Uruli Kanchan News :  उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून शनिवारी (ता. १५) अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गाव बंद ठेवण्याचा निर्णय येथील युवकांनी घेतला होता. त्याला गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे. (Uruli Kanchan News)

संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे.

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर दोन सख्या भावांनी मागील पंधरा दिवसांपासून वारंवार बलात्कार केला होता. यामुळे संपूर्ण गाव हादरले असून, या घटनेचा निषेध म्हणून गावातील युवकांनी एकत्र येऊन गुरुवारी (ता. १४) हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपूर्ण गावात मूक मोर्चा काढला होता. मूक मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात पोलिस दूरक्षेत्र उरुळी कांचन येथे येऊन आक्रमक मागणी करुन पोलिसांना निवेदन देण्यात आले. संबंधित पीडित युवतीला न्याय मिळावा मुख्य आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. (Uruli Kanchan News)

बलात्काराच्या आरोपात अटक केलेला दोघा आरोपींना पोक्सो अंतर्गत कारवाई करुन आरोपींना शिक्षेपर्यंत कारवाईची प्रक्रिया करावी अशी आक्रमक मागणी मोर्चेकरांनी व्यक्त केली. यावेळी घटनेचा निषेध म्हणून उरुळी कांचन शहर शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनासमोर घेतला आहे. तसेच यावेळी गावातील सर्व व्यवहार, दुकाने, व्यवसाय, छोटे-मोठे उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय गावातील नागरिकांनी घेतला आहे.(Uruli Kanchan News)

 

दरम्यान, यावेळी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शनिवारी एक दिवस गाव बंदची हाक देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निवेदन पुणे शहर अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र.५ विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांना देण्यात आले.(Uruli Kanchan News)

शाळा, महाविद्यालये सुरु राहणार..
उरुळी कांचन गाव बंद असले तरी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय व डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालय सुरूच राहणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय सेवा, सार्वजनिक परिवहन सेवा या सुरळीत सुरू राहणार आहेत.(Uruli Kanchan News)

याबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, “उरुळी कांचन भागात घडलेली घटना हि दुर्दैवी आहे. या घटनेमुळे गावातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व गाव बंद राहणार आहे. याबाबतचे निवेदन गावच्या वतीने पुणे शहर पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण गाव बंद राहणार असून या बंदला संपूर्ण गावाने पाठींबा दिला आहे. त्यामुळे उरुळी कांचन एक दिवस बंद राहणार आहे.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Raj Thakrey News : आगामी निवडणुका स्वबळावर लढणार की युती-आघाडी करणार?; राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.