Breaking News : मुंबई : शिवसेनेच्या रणरागिनी आणि ठाकरे गटाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निलम गोऱ्हे यांच्यासह ठाकरे गटाचे दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आज शिंशिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटात सारे काही आलबेल नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपाचे हादरे आता अन्य पक्षांनाही
राष्ट्रवादीत अजित पवारांमुळे घडलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही बसू लागले आहेत. राष्ट्र्रवादीनंतर आता उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Breaking News) सततच्या फुटीमुळे मेटाकुटीला आलेल्या ठाकरे गट शिवसेनेसाठी यापुढे बिकट परिस्थिती येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र, बंडानंतरचा हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
नीलम गोऱ्हे या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता, तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत.(Breaking News) गोऱ्हे यांनी उपेक्षित, पीडित महिलांसाठी काम केले आहे. निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे पाहिले जाते. त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यास ठाकरे गटाल मोठा धक्का बसणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तसेच त्याआधी भाजपबरोबर युती तुटल्यानंतरच्या काळात गोऱ्हे यांनी ठाकरे गटाची बाजू समर्थपणे सांभाळली होती. (Breaking News) विधानपरिषदेतील उपसभापती म्हणूनही त्यांचे काम चांगले चालले होते. असे असतानाही त्या आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा बातम्या सुरु होत्या. मात्र थेटपणे त्यांचे नाव घेतले जात नव्हते. मोबाईलही नॉट रिचेबल येत होता. (Breaking News) अखेर नीलम गोऱ्हे यांचा शिवसेना प्रवेश होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : शिरूरचे आमदार अशोक पवार “साहेबांच्या” सोबतच..