Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : मोठी बातमी! ठाकरे गटाच्या रणरागिणी नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 July 2023, 12:02

Breaking News : मुंबई : शिवसेनेच्या रणरागिनी आणि ठाकरे गटाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निलम गोऱ्हे यांच्यासह ठाकरे गटाचे दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आज शिंशिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटात सारे काही आलबेल नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपाचे हादरे आता अन्य पक्षांनाही

राष्ट्रवादीत अजित पवारांमुळे घडलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही बसू लागले आहेत. राष्ट्र्रवादीनंतर आता उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Breaking News) सततच्या फुटीमुळे मेटाकुटीला आलेल्या ठाकरे गट शिवसेनेसाठी यापुढे बिकट परिस्थिती येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र, बंडानंतरचा हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

नीलम गोऱ्हे या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता, तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत.(Breaking News)  गोऱ्हे यांनी उपेक्षित, पीडित महिलांसाठी काम केले आहे. निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे पाहिले जाते. त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यास ठाकरे गटाल मोठा धक्का बसणार आहे.

 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तसेच त्याआधी भाजपबरोबर युती तुटल्यानंतरच्या काळात गोऱ्हे यांनी ठाकरे गटाची बाजू समर्थपणे सांभाळली होती. (Breaking News) विधानपरिषदेतील उपसभापती म्हणूनही त्यांचे काम चांगले चालले होते. असे असतानाही त्या आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा बातम्या सुरु होत्या. मात्र थेटपणे त्यांचे नाव घेतले जात नव्हते. मोबाईलही नॉट रिचेबल येत होता. (Breaking News) अखेर नीलम गोऱ्हे यांचा शिवसेना प्रवेश होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Breaking News : सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरण! माजी संचालक अमर मुलचंदानी यांना ईडीकडून अटक ; ३ दिवस ईडी कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने दिले आदेश

Breaking News : शिरूरचे आमदार अशोक पवार “साहेबांच्या” सोबतच..

Breaking News : अमोल कोल्हे खासदार पदाचा राजीनामा शरद पवारांकडे देणार ; शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून निर्णय..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Breaking News : पंकजा मुंडेंची आज पत्रकार परिषद; मोठी घोषणा करणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.