पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. (Kiren Rijiju sacked as Law Minister) आता या मंत्रालयाची जबाबदारी अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. (Breaking News: Kiren Rijiju sacked as Law Minister; A major reshuffle in Modi’s cabinet ahead of the upcoming Lok Sabha elections)
मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी दिल्याचे सांगितले जात आहे. (Kiren Rijiju sacked as Law Minister) किरेन रिजिजू यांच्या भू-विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात रिजिजू हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सातत्याने टीका करत होते. (Kiren Rijiju sacked as Law Minister) त्यांच्या याच भूमिकेमुळे रिजिजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर, आगामी निवडणुका लक्षात घेऊन हे फेरबदल करण्यात आल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे.
किरेन रिजिजू हे मागील काही काळापासून सुप्रीम कोर्टावरील टिप्पणी केल्यामुळे चर्चेत होते. त्यांनी कॉलेजियम व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (Kiren Rijiju sacked as Law Minister) रिजिजू यांनी मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये कॉलेजयम सिस्टीम ही संविधानासाठी एलियन आहे, असे म्हटले होते. कॉलेजियम सिस्टीममध्ये अनेक दोष आहेत. लोक याच्या विरुद्ध आवाज उठवत आहे, असे ते म्हणाले होते. तसेच ते म्हणाले की, रिटायर्ड जज व अॅक्टिविस्ट हे भारतविरोधी गँगचा भाग आहे, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर रिजिजूंवर खूप टीका झाली होती.
मागच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या बेंचने रिजिजूंच्या टिप्पणिवर नाराजी दर्शवली होती. (Kiren Rijiju sacked as Law Minister) एनजेएसीला मंजूर न दिल्याने सरकार न्यायमूर्तींच्या नियुक्तीला परवानगी देत नसेल, असे बेंचने म्हटले होते. रिजिजू व उपराष्ट्रापती जगदीप धनखड यांच्या टिप्पणिंच्या विरोधात जनहित याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पहिल्याच दिवशी ही याचिका रद्द केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Politics | राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय काय जमते ? अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर…
Politics : ‘मन की बात’ देशवासियांच्या मनातील कार्यक्रम : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील