राजस्थान : काँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये राजस्थानला लढत होत आहे. मतमोजणी सुरू असून, आघाडीत भाजपाने शंभरीपार केली आहे. राजस्थानमध्ये भाजपने २०० पैकी १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. राजस्थानच्या राजकारणात काँग्रेससाठी क्रमांक दोनचे महत्त्वाचे नेते सचिन पायलट हे त्यांच्या टाँक मतदारसंघात पिछाडीवर गेले आहेत.
मला विजयाची १०० टक्के खात्री : अशोक गेहलोत
राजस्थानमध्ये आपल्याला १०० टक्के विजयाची खात्री असून, निकालाच्या दुसऱ्या दिवशी विजयी उमेदवारांची एक बैठकही मी बोलावली आहे, असे राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निकालापूर्वीच स्पष्ट केले आहे.
भाजपासाठी ‘बल्ले बल्ले’ परिस्थिती असल्याचा विश्वास भाजप नेते जयवीर शेरगिल यांनी व्यक्त केला. तर काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत लोकांना फक्त लुटले आहे. खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळेच लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये भाजपा सत्ता स्थापन करेल, असा विश्वास राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशींनी व्यक्त केला आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण?
राजस्थानमध्ये भाजपाच्या विजयाचा दावा पक्षाचे अनेक नेते, खासदार व वरीष्ठ करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने सरकार स्थापन केल्यास मुख्यमंत्रीपदी कोण असेल? यावर पक्षाचे कोटा नॉर्थमधील उमेदवार प्रल्हाद गुंजाल यांनी सूचक विधान केले आहे. आमच्याकडे वसुंधरा राजेंसारखे ज्येष्ठ नेतृत्व आहे. आम्हाला बाहेरून मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार आणण्याची गरज नाही, असे गुंजाल यांनी म्हटले आहे.