मुंबई : कोकण महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी अजब विधान केले होते. या विधानामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
मुंबईत शनिवारी (ता.३) स्वराज्य कोकण भूमी महोत्सव पार पडला. त्या आमदार प्रसाद लाड यांनी अजब विधान केले होते.
यावेळी बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली,” असे प्रसाद लाड म्हणाले होते.
दरम्यान, प्रसाद लाड यांनी केलेल्या व्यक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्य करत भाजपावर टीका केली. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या,” असा सल्ला राष्ट्रवादीने दिला होते.
या व्यक्तव्यावर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. आणि लाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे अनावधाने माझ्याकडून बोलले गेले. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक शिवनेरीवर जन्म झाला सुधारत संगीतले. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असे प्रसाद लाड यांनी सांगितले. तसेच “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. असेही लाड यांनी सांगितले