Big Breaking : नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे तसेच एस. आर. कोहली यांना निलंबित करण्यात आले आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे निलंबित
शरद पवार यांनी बोलावलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज तासाभरापेक्षा जास्त वेळ चालली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आलं. (Big Breaking ) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते एस. आर. कोहली यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार हेच मुख्य नेते असून, पक्षाबाबत निर्णय घेऊ शकतात, असाही ठराव सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना याबाबत पत्र लिहिलं होतं. अजित पवार गटावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी ही कारवाई केली. या बैठकीत २५ पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. (Big Breaking ) त्यापैकी २२ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांच्या बंडाबाबत या बैठकीत सखोल चर्चा झाली. या बैठकीत काय निर्णय झाले, याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांनी बोलावलेल्या या बैठकीवर आक्षेप घेतला आहे. (Big Breaking ) ही बैठक बेकायदा आहे, अशी भूमिका घेत, पक्षाबाबतचा निर्णय फक्त निवडणूक आयोग घेईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : मोठी बातमी! पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर… लवकरच निर्णय घेणार!
Big Breaking : मोठी बातमी! अजित पवार गटाला ४४ आमदारांचा पाठिंबा… पुतण्याचा काकांना दे धक्का!