Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच नावेतील प्रवासी; राष्ट्रवादीची सूत्रे नक्की कोणाकडे? लवकरच होणार स्पष्ट!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 6 July 2023, 16:50

Pune News : पुणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली, या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने अधिक आहेत त्याचा पक्षावर दावा, या सूत्रानुसार एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. शिंदे यांच्या बंडानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठ्या अग्नीदिव्यातून जावे लागले. तोच प्रकार सध्या शरद पवार अनुभवत आहेत. अजित पवार यांनी बंड करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केली. त्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे. यावरून दोन्ही नेते सध्या एकाच नावेतील प्रवासी असल्याचे स्पष्ट होत आहे.

एकेकाळचे शरद पवार यांचे निकटवर्ती आता त्यांनाच लक्ष्य करू लागले आहेत

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांचे निकटवर्ती समजले जाणारे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे सहकारी आता शरद पवारांना लक्ष्य करू लागले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत शरद पवार यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे प्रफुल्ल पटेल ‘मी लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे. त्यातील तपशील वाचून अनेकांना धक्का बसेल’, असे वादग्रस्त विधान केले आहे. (Pune News)  हे विधान शरद पवार यांना उद्देशून केल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ यांनीही शरद पवार बडव्यांच्या गर्दीत सापडल्याची टीका करत, वेळीच बडवे ओळखा, असे आवाहन केले. भाजपबरोबर जाण्यात चूक काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या सर्व राजकीय घटना-घडामोडी पाहता, गेल्या वर्षी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागले, तीच स्थिती आता शरद पवार अनुभवत आहेत. (Pune News) लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने अधिक आहेत, त्याचा पक्षावर दावा या सूत्रानुसार खासदार-आमदार कोणत्या बाजूला अधिक त्याच्याकडे पक्षाची सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत.

 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या समान धागा असला तरी पवार हे लढण्याच्या भूमिकेत आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी कराडला जाऊन शक्तिप्रदर्शन केले. (Pune News) तसेच बंड करणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र पिंजून काढण्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. यापुढे राष्ट्रवादीतील संघर्ष कोणत्या वळणावर जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा नवा चेहरा कोण? हे नाव आले चर्चेत…!

Pune News : पैसे उधार न दिल्याने दुकानात धिंगाणा घालणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी भरचौकातून काढली धिंड!

Pune News : अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षपदाची आज घोषणा… कोणाची वर्णी? कोणत्या गटाला अधिक पाठिंबा?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

Big Breaking : शरद पवारांची दिल्लीत बैठक; दोघांवर निलंबनाची कारवाई; अजित पवारांना मोठा धक्का!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.