Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 July 2026, 15:46

पुणे: राज्यातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात विकल्या जाणाऱ्या आरोग्यास अपायकारक शीतपेयांवर तसेच दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष मोहीम राबविणार असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत केली. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने ही भूमिका स्पष्ट केली.

आमदार राहुल कुल यांनी राज्यातील अनेक शाळांच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्स, घातक ‘कटिंग पान’ आणि विविध फ्लेव्हर्ड मिल्कची विक्री होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. या उत्पादनांमध्ये कृत्रिम रंग, अतिरिक्त साखर आणि काही ठिकाणी अंमली पदार्थांचा वापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत अशा उत्पादनांवर नियंत्रणासाठी राज्यव्यापी मोहीम राबविण्याची मागणी त्यांनी केली.

यासोबतच राज्यातील दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रभावी धोरण राबविण्याची गरजही त्यांनी मांडली. अनेक दूध संकलन केंद्रांवर तपासणीची सुविधा नसल्यामुळे भेसळीचे प्रकार वाढत असल्याचे सांगत, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, राज्यात अन्न नमुन्यांची तपासणी अधिक वेगाने करण्यासाठी पुणे, नाशिक, रायगड आणि यवतमाळ येथे नवीन अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहेत. सध्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे अशा प्रयोगशाळा कार्यरत आहेत. तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आणखी 22 प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू आहे.

 

मंत्र्यांनी पुढे सांगितले की, अन्न नमुन्यांचे अहवाल पूर्वी तीन महिन्यांनी मिळत होते. मात्र, आता ही प्रक्रिया वेगवान करण्यात आली असून एका महिन्याच्या आत अहवाल उपलब्ध होत आहेत. हा कालावधी आणखी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सदोष अन्नपदार्थ आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यांच्या उत्पादनांचे बॅचेसही मागे घेण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59
Next Post

Τα Προσωπικά Μου Αποτελέσματα Χρησιμοποιώντας τα Εργαλεία Προϋπολογισμού του X3bet Casino στην Ελληνική Επικράτεια

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp