Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 3 July 2026, 17:49

सासवड, (पुणे) : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये काठ्या, खोऱ्याचा दांडा आणि विटांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झाले असून, सासवड पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सासवड परिसरातील तरटीमळा (ता. पुरंदर) येथे बुधवारी (ता. 01) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

सुभाष गणपत जगताप, कुणाल सुरेश जगताप, रणजित सुरेश जगताप, सुधाकर गणपत जगताप, सुभाष जगताप यांचा मोठा मुलगा (नाव माहीत नाही, सर्व रा. तरटीमळा, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मीकांत चंद्रकांत जगताप (वय 52, रा. खुलेरावस्ती जेजुरी रोड, ताथेवाडी, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लक्ष्मीकांत जगताप आणि त्यांचे दोन भाऊ कृष्णकांत व श्रीकांत यांची तरटीमळा येथील गट नं. ९७/२६ आणि ९७/९ मध्ये 29 गुंठे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीबाबत आरोपी सुभाष जगताप आणि त्यांच्या भावांनी कोर्टात दावा दाखल केला असून, त्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. सध्या ही जमीन जगताप बंधू कसत असून, त्यात मक्याचे पीक घेतलेले आहे.

बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीकांत जगताप, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगा अभिषेक हे शेतातील गवत काढण्यासाठी गेले होते. त्यांना पाहताच आरोपींनी “तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही का?” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. लक्ष्मीकांत यांनी तातडीने फोन करून आपल्या दोन्ही भावांना शेतात बोलावून घेतले.

 

लक्ष्मीकांत हे आरोपींना समजावून सांगत असताना, आरोपी कुणाल जगताप याने लक्ष्मीकांत यांचे गचुरे धरून बाजूला ढकलले. लक्ष्मीकांत यांच्या पत्नी जयश्री यांनी “असे का करतो?” असे विचारले असता, कुणाल याने अश्लील शिवीगाळ करत त्यांची मान पकडली. त्याच वेळी लक्ष्मीकांत यांचे दोन्ही भाऊ वहिनी आणि पुतणे धावत आले.

त्यांना पाहताच आरोपी सुभाष जगताप चिडला आणि “सर्वजण आलेत, यांना जिवंत सोडायचं नाही,” असे ओरडत त्याने हातातील बांबूची काठी वहिनी संध्या यांच्या डोक्यात जोरात मारली. तसेच लक्ष्मीकांत यांच्या हाता-पायांवर मारण्यात आली. त्यानंतर सुभाषच्या मोठ्या मुलाने शेतात पडलेली वीट उचलून संध्या यांच्या डोक्यात मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

दरम्यान, भावाला आणि वहिनीला सोडवण्यासाठी गेलेले कृष्णकांत यांच्यावर आरोपी रणजित जगताप याने लोखंडी खोऱ्याच्या दांड्याने हल्ला करून त्यांचे हात, पाय आणि पाठीवर जबर मारहाण केली. वहिनी मनिषा सोडवण्यास आली असता, सुभाष जगताप याने तिच्या पाठीत दगडी वीट मारून दुखापत केली. त्यानंतर सुभाषच्या मुलाने पुन्हा काठी आणून लक्ष्मीकांत आणि कृष्णकांत यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सासवड पोलिसांनी आरोपींविरुद्ध विनयभंग, गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49
Next Post

Number One Selection for Online Slots in Canada Is Mafia Casino

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp