Big Breaking : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अनेक महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत. एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार यांनी या दोन्ही बड्या नेत्यांना थेट पक्षातून बडतर्फ केलं आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षातून बडतर्फ
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. या दोघांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शरद पवार यांनी ही मोठी कारवाई केली आहे. (Big Breaking ) प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा दिल्याने त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या सर्व नेत्यांना नोटीस पाठवत अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे. (Big Breaking ) तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना बडतर्फ केले आहे. यामध्ये शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे, विजय देशमुख यांचा समावेश आहे. जयंत पाटील यांनी याबाबतचं पत्र संबंधित नेत्यांना पाठवलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे.
जयंत पाटीलांनी काय लिहिलंय पत्रात?
“महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे, विजय देशमुख हे नेते उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. (Big Breaking ) त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून आणि पक्षाच्या विविध पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे”, असं जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी नव्हे…
अजित पवार यांच्या बंडानंतर अनेक आमदारांनी अजितदादांना पाठिंबा दिला आहे, तर अनेक आमदार साहेब, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे सांगत आहेत. अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे पक्षातील अंतर्गत बंडाळीचा सामना करण्यासाठी शरद पवार कंबर कसून उभे राहिले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : अजितदादांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांना नोटीस; अपात्र ठरण्याची शक्यता?