(Ambedkar Jayanti 2023 ) पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला वडगावशेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच खराडीतील श्री काळभौरवनाथ अभ्यासिकेत मोफत वर्तमानपत्र पठारे यांच्या माध्यमाधून सुरु करण्यात येवून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले.
यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी शिक्षणाधिकारी बाळासाहेब सातव, प्रा. शेख सर, निवृत्त मुख्याध्यापक गंगाधर रासगे तसेच सचिन चव्हाण, मनिष कुडाळकर, राजकुमार डाकोरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
पठारे म्हणाले की..!
” वाचनाची चळचळ आता सुरु राहणे ही आता काळाची गरज आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्तमानपत्र उपयुक्त ठरते, हे मान्यच आहे, परंतू वर्तमानपत्र वाचल्याने माणूस प्रगल्भ बनतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते वर्तमानपत्र वाचू नयेत. त्यातून काहीतर मंत्र घेत आयुष्यातील स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे.”
खराडीगावासह इतर भागातील ही विद्यार्थ्यांनाही शांतपणे अभ्यास करता यावा, यासाठी मंदिर परिसरात ही अभ्यासिका मोफत सुरु करण्यात आली आहे. असे सांगून या अभ्यासिकेतून जास्तीत जास्त अधिकारी तयार व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
खराडीगावातील काळभैरवनाथ मंदिरात ही मोफत अभ्यासिका उभारली असून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कंपार्टमेंट कुशनच्या खुर्च्या, शुध्द पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्सासिकेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन यावेळी अभ्यासिका व्यवस्थापनाने केले आहे.
तसेच येथेच मोफत ग्रंथालय देखील उभारण्यात आले असून स्पर्धा परीक्षांची पुस्तकांसह आवांतर वाचनाती पुस्तके मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.