Ambadas Danave : छत्रपती संभाजीनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. केसीआर यांनी काल विठ्ठल मंदिरात जात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यानंतर यांची पंढरपूरमध्ये जाहीर सभा झाली. केसीआर यांच्यासाठी मटणाचादेखील बेत आखण्यात आला होता. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कडाडून टीका केली. चिकन-मटण खाऊन, कोंबड्या कापून केसीआर पंढरपूरला गेले. केसीआर यांनी खोटी भक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ध्यानात घ्यावं की महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये फरक आहे. इथली जनता या गोष्टी स्विकारणार नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.(Ambadas Danave)
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत.
या वेळी अंबादास दानवे यांनी कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली आहे. एक जुलैला शिवसेनेचा ठाकरे गट मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. त्यावर बोलताना काहीही झाल तरी मोर्चा होणारच आहे.(Ambadas Danave) कित्येक वेळेस परवानग्या न घेता मोर्चा काढलेला. यापूर्वीही असे मोर्चे काढले आहेत. सरकार काय करणार, परवानगी म्हणजे एक कागद आहे, असं दानवे म्हणाले.
सरकार ईडीच्या माध्यमातून राजकीय नेते नव्हे तर अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी काम करावं की नाही, सचिन सावंत कोणत्या प्रकरणात अटक झाली मला माहित नाही, असं म्हणत आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या अटकेवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Ambadas Danave)
मविआची बैठक आहे माहिती आहे. यात संघटनात्मक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. पक्षप्रमुख ठरवतील कोणाला पाठवायचं. संजय राऊत यांचे बैठकीसंदर्भात विधान मला माहित नाही, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी बैठकीवर भाष्य केलं. दबंग आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या सुनील केंद्रेकर राजीनामा दिला आहे. त्यावरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Ambadas Danave)
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण सुनील केंद्रेकर यांना आहे. मराठवाड्याच्या मातीशी जुळलेले आहेत. त्यांनी एक रिपोर्ट केला यावर सरकारला काही सूचना केल्या. याच्या बातम्या आल्यात. याचा सरकारमधील लोकांना त्रास झाला. यामुळे केंद्रेकरांना राजीनामा द्यायला भाग पाडले. केंद्रेकर स्वाभिमानी आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकून मारला. ही स्वेच्छानिवृत्ती नाही. त्यांना बळजबरीने राजीनामा द्यायला लावला असेल, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.
संजय राऊत घाबरणार नाहीत. राजकीय हेतूने या सर्व गोष्टी होत आहेत. आता जामीन रद्द होऊ शकणार नाही, ते लढाऊ नेते आहेत, असं म्हणत पत्राचाळ प्रकरणावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Ambadas Danave)