हिंमत होती तर तुम्हीही नवीन पक्ष काढायचा होता ना? अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले
Ajit Pawar Taunted Eknath Shinde : कोल्हापूर : महाराष्ट्रात पक्ष पोहचवला, ज्यांनी वडिलांनी पक्ष काढला, ज्या पक्षामुळे निवडुण आले. त्यांचाच पक्ष काढून घेतला. हिंमत होती तर नवा पक्ष काढायचा होना ना ? असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ललकारले. (If you had the guts, you too can form a new party, Ajit Pawar challenged Chief Minister Eknath Shinde)
कोल्हापुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना साधला निशाणा
कोल्हापुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पवारांनी शिंदे फडणवीस सरकारसह मोदी सरकारवर निशाणा साधला.
पवार म्हणाले, मी स्पष्ट सांगतो. पक्ष संघटनेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे उद्याच्या काळात पक्षात भाकरी फिरवावी लागणार आहे. भाकरी फिरवली जाणार आहे. परवा आमची बैठक झाली. (Ajit Pawar Taunted Eknath Shinde) त्यात 25 नेते होते. या बैठकीतही मी सांगितलं. फेरबदल झाले पाहिजे. आमच्यापासूनच आम्ही सुरुवात करणार आहोत, असं सांगतानाच बारामती, पिंपरी, पुणे आणि पुणे ग्रामीणमध्ये नव्या लोकांना संधी देणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
महानगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज्य ढवळून काढायचं आहे. मला मुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा नाही. देशाच्या पंतप्रधान मुर्म आहेत सांगतात. (Ajit Pawar Taunted Eknath Shinde) कसं सरकार चाललंय? शेतकऱ्यांना 50 हजारांची मदत अजून दिली नाही, कसल्या याद्या करत आहात? शेतकऱ्यांच्या इतक्या समस्या आहेत. सरकार काय करतंय? हे सर्व सामान्यांचे सरकार आहे असं म्हणतात. अरे कशाच सर्वसामान्यांचे सरकार? असा सवाल त्यांनी केला. महिलांना एसटी मोफत करण्यापेक्षा गॅस दर कमी केला असता तर महिलानी डोक्यावर घेतलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यकर्त्यांना जनतेसमोर जायला कोणताच मुद्दा राहिलेला नाही.(Ajit Pawar Taunted Eknath Shinde) म्हणून भावानिक मुद्दे समोर आणले जातं आहेत. सत्तेची नशा, मस्ती त्यांच्या डोक्यात चढली आहे. ज्यांनी पक्ष काढला त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेतला. हिंमत होती तर तुम्हीही नवीन पक्ष काढायचा होता ना?, असा सवाल त्यांनी केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar : गौतमी पाटीलने बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो…. अजित पवार म्हणाले…