Ajit Pawar News : बारामती : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. नेमका हाच धागा पकडत विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी निवडणुकांमध्ये बटन दाबताना महागाई लक्षात ठेवा, असा सल्ला दिला. (Remember Inflation While Pushing Button In Elections: Ajit Pawar)
अजित पवार आज (रविवार) बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. ज्येष्ठ नागरिक निवास येथील वाढीव भोजन कक्ष व करमणूक कक्ष इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.(Ajit Pawar News)
पवार म्हणाले, महागाई कशी वाढत चालली आहे, ती सतत तुमच्या डोक्यात रहावी, म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देत आहे. (Ajit Pawar News) कुठे बटन दाबताना ही महागाई लक्षात राहिली पाहिजे, अशा मिश्किल शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वाढत्या महागाईवर सत्ताधाऱ्यांना चिमटे घेतले.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये महागाईचा मुद्दा प्रभावी ठरणार
ते म्हणाले, येथील एका कक्षाचे बांधकाम ५० हजारात पूर्वी झाले होते. मात्र त्याच्या नुतनीकरणासाठी ३ लाख रूपये खर्च आला. महागाई कशी वाढत चालली आहे. हे तुमच्या लक्षात रहावे यासाठी मी सांगतो आहे. (Ajit Pawar News) त्यामुळे येथून पुढे बटन दाबताना महागाई लक्षात ठेवा, अशा शब्दात अजित पवार यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये महागाईचा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याचे सुतोवाच केले.देशासमोर महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, देशाची लोकसंख्या वाढली आहे. चीनला देखील लोकसंख्येच्या बाबतीत आपण मागे टाकले आहे. (Ajit Pawar News) तरूणांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ज्येष्ठांची संख्या देखील वाढली आहे. घरामध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काही मेडीकल इमर्जन्सी आली तर अशा वेळी ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र उपयुक्त आहे, असेही पवार म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar : वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी..
Baramati crime : बारामती शहरातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; दोन पिडीत महिलांची सुटका