Ajit Pawar News : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (ता. 2) शपथविधी होण्याची शक्यता असून, ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार असून, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीचे नऊ आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची तयारी जोरदार सुरू आहे. ४० आमदारांनी अजितदादांना पाठिंबा दिला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.(Ajit Pawar News)
अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे.
याबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, अजितदादांचे सरकारमध्ये स्वागतच आहे. ते अनुभवी आणि जबाबदार नेते आहेत. प्रशासनाची उत्तम जाण असलेला नेता सरकारमध्ये येतात, ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. सरकारला पाठिंबा देण्यासाठी जे-जे आमच्यासोबत येतील, त्यांचे स्वागतच आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र अद्याप प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.(Ajit Pawar News)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांची बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा अजित पवार यांनी स्वीकार करावा, अशी ठाम भूमिका काही नेत्यांनी घेतल्याची दिसली होती.(Ajit Pawar News) या बैठकीनतंर मात्र अजित पवार हे काही आमदारांसोबत राजभवनाकडे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर अनेक भाजपचे नेते राजभवनावर उपस्थित असल्याची माहिती आहे.
संघटनेत पद देण्याची मागणी केल्यानंतर देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वात समर्थक आमदार आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली, याच बैठकीनंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामाटे, दौलत दरोडा, अतुल बेनके, आदिती तटकरे, संग्राम जगताप हे उपस्थित होते.(Ajit Pawar News)
बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते.(Ajit Pawar News)
… राष्ट्रवादीचे हे नेते होतील मंत्री!
– छगन भुजबळ
– दिलीप वळसे पाटील
– हसन मुश्रीफ
– धनंजय मुंडे
– अदिती तटकरे
– संजय बनसोडे,
– अनिल पाटील
– धर्मरावबाबा अत्राम
– नरहरी झिरवाळ