नागपूर : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एकमेकांच्या मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवण्याच आव्हान दिलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुका ठाण्यातून लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज पुन्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चँलेज केले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत. धारावीचा विकास होताना एका व्यक्तीचा विकास नको. निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते. निवडणुका होत नाहीत, पुणे, चंद्रपुरात निवडणुका नाही सिनेटची निवडणुक देखील हे घेत नाहीत त्यांच्यात हिंमतच नाही. हे घटनाबाह्य सरकार आहे.
मुख्यमंत्री काय उत्तर देणार?
या अगोदर अनेकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ठाण्यातून निवडणूक लढण्याचे चँलेज दिले होते. आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देखील दिले होते. “लोकशाहीत कोणाला कुठेही निवडणूक लढवण्याची मुभा आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते . आता पुन्हा आदित्य ठाकरेंनी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.