Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरी बुद्रूक येथील फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 15 December 2023, 17:37

लोणी काळभोर (पुणे) : मांजरी बुद्रूक (ता. हवेली) हद्दीतील गोडबोले वस्ती परिसरातील एका फर्निचरच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी सापडल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांकडून मागील दोन तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी बुद्रुक परिसरात फर्निचरचे मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. काही वेळातच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली. मात्र, या गोडाऊनमध्ये लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही वेळातच भडकली. जवानांनी आगीवर पाण्याचा जोरदार मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला.

गोडाऊनला लागलेली आग शॉर्ट सर्किटने लागल्याची चर्चा आहे. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या ७ अनिशामक गाड्या व पीएमआरडीची एक गाडी यांच्याकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

 

दरम्यान,  या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलातील केंद्रप्रमुख अनिल गायकवाड, कैलास शिंदे, हडपसर केंद्राचे चालक नारायण जगताप, फायरमन बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, नितेश डगळे, चंद्रकांत नवले, संदीप रणदिवे, गौरव कांबळे, उन्मेष कोंडगेकर, माने, जोशी, यादव, ओव्हाळ प्रयत्न करीत होते. तसेच ड्युटी संपवून घरी चाललेले तांडेल जवान मंगेश टकले आणि ड्रायव्हर दत्ता आडागळे यांनी घटनास्थळी पोचून शर्थीचे प्रयत्न केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
recruitment state transport department chandrapur

मुंबई महानगरपालिकेत 58 पदांसाठी भरती, थेट मुलाखतीमधून उमेदवाराची निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.