युनूस तांबोळी
शिरूर : केंद्राताली सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्र राज्यातील उद्योग डबघाईला आणून ते गुजरात मध्ये पळवून नेण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे राज्याची आर्थीक घडी विस्कळीत होऊन बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविषयी तरूण पिढीने जागरूक रहाणे गरजेचे आहे. असे मत माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
काठापूर खुर्द ( ता.शिरूर ) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना दिलिप वळसे पाटील म्हणाले, राज्यात नवीन सरकार येऊन तीन महिने होऊन गेले. त्यातून मंत्रीमंडळाचा विस्तार नाही. त्यामुळे राज्यातील विकास कामांना गती मिळण्याऐवजी खिळ बसली आहे. या सरकारच्या चूकीच्या धोरणांचा तरूण पिढीने विचार करावा.
शिरूरचे माजी आमदार शिरूर पोपटराव गावडे म्हणाले, गेल्या ५० वर्षात राजकारण करत असताना सर्वसामान्य जनतेच्या सुख दुखात सामिल होऊन विकास कामे केली आहेत. त्यामुळेच दुष्काळग्रस्त असणारा हा शिरूर तालुका बागायत करण्यात मदत झाली. धरणे, रस्ते, विजेच्या समस्या सोडविल्याने या भागात विकास कामांना गती मिळाली. आरोग्य व शिक्षणाच्या सुवीधांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांचे आर्थीक स्तर वाढल्याचे दिसून येत आहे.
यावेळी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भिमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे,गटविकास अधिकारी प्रशांत देसाई, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, माजी पंचायत समिती सदस्य अरूणा घोडे, उपविभागीय अभीयंता रवींद्र चनाले, माजी सरपंच दामू घोडे, दिपक दुडे, गोविंद गावडे, बाळासाहेब डांगे, सागर दांगट आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रत्साविक बिपीन थिटे यांनी केले. सुत्रसंचालन नरेश ढोमे यांनी तर आभार भाऊसाहेब औटी यांनी मानले.