अजित जगताप
सातारा : पी. एफ.आय. या संघटनेने मोर्चा काढून पुणे येथे “पाकिस्तान जिंदाबाद” या घोषणा दिल्या प्रकरणी सदर संघटनेवर बंदी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा निषेध मोर्चा काढण्यात आला.आता लोकशाही नंतर मनसेचे ठोकशाहीने उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील पुणे येथील पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिल्या असून शासनाने याचा सखोल तपास करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्रात हिंदु-मुस्लिम बांधव एकत्र राहत असून बांगलादेशी अनधिकृत नागरिक हे जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न करत आहेत, पी. एफ. आय. या संघटनेच्या काहींनी पुणे येथे “पाकिस्तान जिंदाबाद” या घोषणा दिल्या प्रकरणी सदर संघटनेवर बंदी आणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली.या घटनेच्या निषेधार्थ माण मध्ये संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढून
दहिवडीचे स. पो. नि. अक्षय सोनवणे यांना निवेदन दिले .यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार,माण तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे,विठ्ठल जाधव,नानासो कट्टे,अक्षय तुपे,धनराज जाधव,सागर कट्टे,धीरज कट्टे,दत्ता बागल, हरिभाऊ जाधव,शुभम खंडे, सूरज कदम,सुरज पवार,शुभम रणपिसे,निखिल जाधव,हिमांशू खरात,सोमनाथ रणपिसे,विश्वराज कट्टे,वरुण गोसावी आशुतोष कट्टे,शुभम कट्टे,व मनसे सैनिक उपस्थित होते.
दरम्यान, पुणे येथील मोर्चात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पुणे पोलिसांनी लेखी स्पष्ट केले आहे.त्यामुळे अफवा पसरविणाऱ्या काही प्रसार माध्यमे व सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्यांर कडक कारवाई करावी काही जेष्ठ नागरिकांनी मागणी केली आहे.परंतु, अध्यापही कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.