India Cricket : भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या देशांतर्गत स्पर्धेची तयारी करत आहेत. दरम्यान, बीसीसीआयने टीम इंडियाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणवर मोठी जबाबदारी सोपवली असल्याची माहिती मिळत आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ किमान एक वर्षाने वाढवण्यात येणार आहे. त्याचा सुरुवातीच्या तीन वर्षांचा करार सप्टेंबर 2024 मध्ये संपत असून बीसीसीआयकडून लक्ष्मण यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे.
लक्ष्मण यांना कुणाची मिळणार साथ..
लक्ष्मण यांचे नाव आयपीएल फ्रेंचायझीकडून मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुढे केले जात होते, परंतु आता ते पुन्हा एनसीएमध्ये त्यांचे पद स्वीकारणार आहेत. आता अशा परिस्थितीत त्याची आयपीएलमध्ये कोणतीही भूमिका असणार नाही. साईराज बाहुतुले, शितांशु कोटक आणि हृषिकेश कानिटकर या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व दिग्गजांचा समावेश असलेल्या प्रशिक्षकांकडून त्यांना मदत केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लक्ष्मण यांचा करार विस्तार बेंगळुरुच्या बाहेरील नवीन अत्याधुनिक NCA कॅम्पसच्या उद्घाटनापूर्वी करण्यात आला असून ज्याचा पाया कर्नाटक सरकारने मंजूर केल्याच्या 14 वर्षांनंतर जानेवारी 2022 मध्ये घातला गेला होता. कॅम्पस बीसीसीआयला 99 वर्षाच्या लीजवर देण्यात आले आहे.
बेंगळुरूमध्ये आता नवीन NCA ..
बेंगळुरूमध्ये आता नवीन NCA तयार होत आहे. नवीन NCA मध्ये किमान 100 खेळपड्या असणार आहे. त्यापैकी 45. खेळपट्ट्या इनडोअर सुविधासह आहेत यामध्ये तीन आतरराष्ट्रीय आकाराचे मैदान, एक आधुनिक पुनर्वसन केंद्र, निवास सुविधा आणि ऑलिम्पिक आकाराचा पूल यासह इतर अनेक सुविधा असणार आहे. नवीन NCA चे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून हे NCA कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.