Tilak Varma Viral Video: टीम इंडियाचा ऑस्ट्लिया दौरा नुकताच संपुष्टात आला आहे. भारताने वनडे मालिका गमावली असली तरी भारतीय संघाने टी-ट्वेंटी मालिका 2-1 ने जिंकली आहे. अखेरचा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. यानंतर सूर्याने तिला वर्मासोबत (Tilak Varma) जे काही केलं याचा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओत काय?
टीम इंडियाने हि मालिका जिंकल्यानंतर, तिलक वर्मा याचा वाढदिवस ड्रेसिंग रूममध्ये साजरा करण्यात आला. हा व्हिडिओ तिलकने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी कॅप्टन सूर्याने तिलक वर्माला बर्थडे बॉम्ब दिले. व्हायरल व्हिडिओमध्ये सूर्यकुमार एका काचेत काहीतरी ढवळताना दिसून येत आहे. त्यावेळी सूर्याने तिलकला बिर्थडेचा केक कापण्यासाठी बसवलं. यात तो म्हणतो ” तुझे केस चांगले दिसायाला हवेत अशी माझी इच्छा आहे”.
पाहा व्हिडीओ:
सूर्या तिलकच्या डोक्यावर ग्लास…
त्यानंतर कॅप्टन सूर्याने तिलकला शर्ट काढायला सांगितला. तिलक केक कापतो आणि सूर्या त्याच्या डोक्यावर ग्लास ओतताना या व्हिडिओत दिसून येत आहे. तसेच तो तिलकच्या चेहऱ्यावर केक लावतो. तिथं बाजूला उभ्या असलेल्या अर्शदीप सिंगनेही तिलकच्या चेहऱ्यावर केक लावला. तिलकही अर्शदीपला केक लावतो. त्यानंतर तिथून दुसरा केक खाण्यासाठी आलेला शिवम दुबे हसत हसत पळून जाताना दिसत आहे.
यानंतर भारतीय संघाचं फोटो सेशन होतं आणि टीम इंडिया ड्रेसिंग रुममधून हॉटेलवर जाते. त्यावेळी प्रशिक्षक गौतम गंभीरला देखील हसायला लागतो.






