Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 3 September 2026, 20:11

यवत, (पुणे) : मोक्का कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील जामिनावर बाहेर असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला 2 गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे आणि 2 मोकळ्या मॅगझिनसह यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहजपूर (ता. दौंड) हद्दीतील ‘मंगलमूर्ती मिसळ’ हॉटेलच्या शेजारी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली.

समीर जावेद सय्यद (वय 26, रा. सहकार नगर, टिळेकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 55 हजार रुपयांचा शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार धीरज जाधव यांनी तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 31) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास यवत पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार धीरज जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मोक्कातील आरोपी समीर सय्यद हा बेकायदेशीर गावठी पिस्तूल विक्री अथवा हस्तांतरणासाठी सहजपूर येथील मंगलमूर्ती मिसळ हॉटेलच्या बाजूला येणार आहे.

माहिती मिळताच यवत पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. संशयित आरोपी समीर सय्यद तिथे येताच पोलिसांनी त्याला चौफेर घेरून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी लोखंडी 2 गावठी पिस्तूल,
10 पिवळ्या धातूची जिवंत काडतुसे, व 02 लोखंडी मॅगझिन असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

दरम्यान, आरोपी समीर सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी 3 गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत. त्यापैकी 2 गुन्हे यवत पोलीस ठाण्यात तर 1 गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात थेट ‘मोक्का’ कायद्यानुसार दाखल आहे. या गुन्ह्यांमध्ये तो सध्या जामिनावर बाहेर आला होता आणि पुन्हा बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे.

सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मैतलवाड पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संदीप देवकर, धीरज जाधव, अमोल भुजबळ, प्रतीक जगताप, सचिन गुंड, दिनेश लोणकर व विनीत कुऱ्हाडे यांच्या पथकाने केली.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp