Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी : चांदणी चौक ते भूगाव या ६० मीटर रुंदीच्या रस्त्यासह उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी काढण्यात आलेली निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, आता या कामासाठी फेरनिविदा काढण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी बुधवारी (दि. २) याबाबत आदेश दिले.

महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या माध्यमातून चांदणी चौक ते भूगाव दरम्यान रस्ता, उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेवर काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. या प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ४५ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे निविदा प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

या आरोपांची दखल घेत प्रशासनाने यापूर्वीची निविदा रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता इच्छुक ठेकेदारांना नव्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

दरम्यान, ४५ कोटी रुपयांनी खर्च वाढल्याचा आरोप महापालिकेच्या प्रकल्प विभागाने फेटाळला आहे. प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अंदाज समितीने डिसेंबर २०२५ मध्ये प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाज निश्चित केला होता. त्यानंतर बांधकामासाठी आवश्यक असलेल्या काही वस्तूंच्या दरात वाढ झाली.

 

तसेच निविदा प्रक्रिया राबविताना पूर्वी मंजूर करण्यात आलेला नकाशा आणि प्रत्यक्षात करावयाचे काम यामध्ये काळानुसार काही बदल करणे आवश्यक झाले. या बदलांमुळे महापालिकेने पूर्वी निश्चित केलेल्या दराच्या तुलनेत सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च वाढल्याचे गोजारे यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे आरोप करण्यात आल्याप्रमाणे ४५ कोटी रुपयांची वाढ झालेली नसून, प्रत्यक्षात अपेक्षित खर्च आणि निविदेतील खर्चामध्ये सुमारे दीड कोटी रुपयांचा फरक असल्याचा दावा प्रकल्प विभागाने केला आहे.

मात्र, निविदा प्रक्रियेबाबत आरोप झाल्यानंतर प्रशासनाने तीच प्रक्रिया पुढे न नेता फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकल्पाकडे आता पुन्हा लक्ष लागले आहे. नव्या निविदा प्रक्रियेत कामाचा खर्च, तांत्रिक बदल आणि दर याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात गणेश विसर्जनासाठी मोठे ट्रॅफिक बदल! 17 प्रमुख रस्ते बंद, 48 तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Thursday, 24 September 2026, 9:36

अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; विसर्जनाचे 4 शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या वेळ

Thursday, 24 September 2026, 9:32

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर अचानक गोंधळ! मालगाडी बंद पडली अन् प्रवाशांचे झाले हाल

Thursday, 24 September 2026, 9:16

मेट्रो सुरू होणार होती, पण आला ‘हा’ अडथळा; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं उद्घाटन पुढे ढकललं

Thursday, 24 September 2026, 9:06

पुणे भाजपमधून दुःखद बातमी! माजी नगरसेवक प्रवीण वस्ते यांचे निधन

Thursday, 24 September 2026, 8:54

झोपेतच आगीने घेरलं! 40-50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

Thursday, 24 September 2026, 8:39
Next Post

Daily Horoscope: कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी 'या' राशींचे भाग्य चमकणार! श्रीकृष्णाच्या कृपेने धनलाभ अन् मोठी खुशखबर?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp