Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनस जाहीर; किती रुपये मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 29 October 2026, 15:16

मुंबई : दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि कामगारांसाठी बोनसची घोषणा केली जात असताना आता मुंबई महानगरपालिकेनेही आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी २०२६ निमित्त ३३ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बोनसच्या रकमेत दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला असून, यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे पत्रकार परिषदेत माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे सणाच्या खरेदीसाठी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा बोनस देण्यात आला होता. यंदा ही रक्कम वाढवून ३३ हजार रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा दोन हजार रुपये अधिक मिळणार आहेत. या बोनसपोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे. केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपये, तर आशा सेविकांना सहा हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वर्ग एक आणि वर्ग दोनचे अधिकारी, विविध श्रेणीतील कामगार, ठोक पगारी कर्मचारी, वाहनचालक, केडीएमटीचे कामगार, महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक तसेच विविध आरोग्य योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांनी बोनस जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या जातात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सारसबागेतील शुभम बनसोडे प्रकरणात घायवळ कनेक्शन? कारच्या मालकाबाबत समोर आली धक्कादायक माहिती..

Friday, 30 October 2026, 18:25

तिसऱ्या महायुद्धाची चाहूल की मोठं संकट? 12 देशांच्या नागरिकांना इशारा; अन्नधान्य आणि औषधांचा साठा करण्याच्या सूचना!

Friday, 30 October 2026, 17:53

राजकीय कुरघोड्यांत नेते व्यस्त; पुणे-सोलापूर महामार्ग बेवारस!

Friday, 30 October 2026, 17:34

उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात

Friday, 30 October 2026, 17:08

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा! फडणवीस सरकारने सुका चारा, मुरघासाचे दर केले निश्चित

Friday, 30 October 2026, 16:58

पुण्यात शिंदे गटाला मोठा धक्का! शिवसेनेच्या बड्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

Friday, 30 October 2026, 16:41
Next Post

लोणी स्टेशन चौकात धोकादायक पद्धतीने वाहन उभे; चालकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp