Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 3 September 2026, 22:48

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातील लिपिकाला १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. उमेश सुबराव कुटे (वय ३७, लिपिक, करसंकलन विभागीय कार्यालय, सांगवी, पिंपरी-चिंचवड महापालिका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मालमत्ता कराची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात त्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागा खरेदी करून त्यावर तीन मजली इमारत बांधली आहे. या इमारतीची नवीन मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी त्यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाच्या सांगवी विभागीय कार्यालयात अर्ज केला होता.

या अर्जाच्या अनुषंगाने आरोपी लिपिक उमेश कुटे याने तक्रारदाराशी संपर्क साधला. इमारतीचा वार्षिक मालमत्ता कर ९१ हजार ४७२ रुपये होणार असून, तो कमी करून ५० हजार रुपयांच्या आत करता येईल, असे त्याने सांगितल्याचा आरोप आहे. त्यासाठी कुटे याने सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदाराने याबाबत २ सप्टेंबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी ३ सप्टेंबर रोजी करण्यात आली. यावेळी आरोपी उमेश कुटे याने पंचासमक्ष मालमत्ता कर कमी करून देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १ लाख २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

यानंतर ACBच्या पुणे युनिटने सापळा रचला. आनंदनगर, सांगवी येथील स्विमिंग टँक रोडवर दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना उमेश कुटे याला पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला ३ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक-१ अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी केले. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके हे पर्यवेक्षण अधिकारी होते. सापळा पथकात पोलीस कॉन्स्टेबल कैलास महामूलकर, पोलीस कॉन्स्टेबल अश्विन कुमकर आणि सहायक फौजदार अविनाश चव्हाण यांचा समावेश होता.

लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp