Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 3 September 2026, 21:38

पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत प्रतिबंधित प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी जय भवानी मित्र मंडळाच्या अध्यक्षाला न्यायालयाने १ हजार रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोन दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या काळात प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या आदेशाबाबत तोंडी तसेच लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला होता.

मात्र, ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठ ते पावणेबाराच्या दरम्यान पिंपळे निलख परिसरात जय भवानी मित्र मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. गणेशनगर चौक ते पिंपळे निलख मेन बसस्टॉपदरम्यानच्या मिरवणुकीत नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असलेल्या प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष बजरंग विनायक लकडे यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२५ नुसार बीएनएस कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सबळ पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र क्रमांक १५९/२५ न्यायालयात दाखल केले.

 

या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी, पुणे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने ३ सप्टेंबर २०२६ रोजी बजरंग लकडे यांना १ हजार रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त संदिप आटोळे आणि सहायक पोलीस आयुक्त मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस उपनिरीक्षक एम. एस. भालेराव, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार ८५४ साळुंखे आणि पोलीस हवालदार ९४२ करे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, गणेशोत्सव २०२६ आणि गणपती विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणत्याही गणेश मंडळाने प्रखर बीम लाईट, लेझर बीम लाईट किंवा नागरिकांच्या डोळ्यांना व आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या प्रकाशयंत्रणांचा वापर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पूर्वसूचना न देता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच संबंधित प्रकाशयंत्रणा जप्त करण्यात येणार असून, त्यासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक जबाबदार राहतील, असा इशारा पोलीस उपायुक्त संदिप आटोळे यांनी दिला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp